रंगभूमी या सांस्कृतिक नाटय़ चळवळीच्या माध्यमातून युवा व बालकलावंतांच्या उत्साहात सिव्हील लाईनस्थित इंडिया पिस सेंटरमध्ये नाटय़ व चित्रपट अभिनय कार्यशाळा सुरू आहे. या कार्यशाळेला एनसीसीआय आणि इंडिया पिस सेंटर यांचेही सहकार्य लाभले आहे.
मागील १४ वर्षांपासून बहुजन रंगभूमी कार्यशाळेचा हा उपक्रम नागपूर व महाराष्ट्रासह देशातील अन्य भागातही राबवत आहे. विशेष करून गरीब तसेच या क्षेत्रापासून विरक्त असलेल्या प्रवाहाला यात सामावून सामान्यतेला असामान्य शिखर प्राप्त करून देण्याची धडपड सातत्याने करीत आहे. यातूनच अनेक सशक्त कलावंत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय नाटय़ पटलावर आपल्या अभिनय प्रतिमेची छाप उमटवित आहेत. याचबरोबर हिंदी चित्रपट, मालिका, जाहिरातींमध्येसुद्धा कलावंत मोठय़ा प्रमाणावर समोर येत आहे.
सातत्याने २४ वर्षांपासून थिएटरकरिता वाहिलेल्या बहुजन रंगभूमीच्या सांस्कृतिक प्रवासाला नाटककार वीरेंद्र गणवीर यांच्या मार्गदर्शनातून संपूर्ण देशात आंबेडकरी नाटकाचा पुनश्च एकदा विचारप्रवाह गतिमान होऊ लागला आहे. यामध्ये सुरेंद्र वानखेडे, राहूल गावंडे, अतुल सोमकुंवर, तृषांत इंगळे, सुहास खंडारे, धम्मपाल माटे, वैष्णवी करमरकर, प्रिती नारनवरे या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे. या कार्यशाळेत लेखन, दिग्दर्शन, अभिनयासह बॅकस्टेज तसेच चित्रपट, कॅमेऱ्यासमोरील अभिनय, दिग्दर्शनाचे धडे बारकाईने विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीकोनातून अधिक प्रगल्भ करण्याची धडपड कार्यशाळेतील तज्ज्ञ मंडळी करीत आहेत. 

Story img Loader