तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून गौरी सावंत यांची ओळख आहे. ‘उंच माझा झोका’ या पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला. त्या ‘आजीचं घर’ ही संस्था चालवतात. या संस्थेमार्फत देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलींचं त्या संगोपन करतात. नुकतंच गौरी सावंत यांनी झी मराठी वाहिनीवरी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
आणखी वाचा – “एक चट्टान, सौ शैतान” अंगावर काटा आणणारा अजय देवगणच्या ‘भोला’चा टीझर प्रदर्शित; तुम्ही पाहिलात का?
या कार्यक्रमादरम्यान गौरी सावंत यांनी त्यांच्या ‘आजीचं घर’ या संस्थेबाबत सांगितलं. हे सांगत असताना त्यांनी मुंबईच्या रेड लाइट एरियामधील एक प्रसंग सांगितला. हा प्रसंग अंगावर काटा आणणारा होता. झी मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये गौरी सावंत यांनी एक प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या, “मी एकदा मुंबईच्या रेड लाइट एरियामध्ये दुपारी सहज पाहणी करण्यासाठी गेले होते. महिलांच्या आरोग्याची तपासणी नियमित होत आहे की नाही हे पाहण्यासाठी मी तिथे गेले. तेव्हा एक प्रसंग घडला. तिथे २० ते २२ वर्षांची एक मुलगी होती. तिच्या बाजूला एका लहान मुलगी बसली होती. त्या लहान मुलीकडे बघून मी हसले. तेव्हा ती २० ते २२ वर्षांची मुलगी मला म्हणाली, तूला ही पाहिजे का? मी तिला विचारलं की, तू माझ्याकडे पाठवणार का? यावर तिने मला उत्तर दिलं की, जर हिला तुझ्याकडे पाठवलं नाही तर हीदेखील त्याच वळणावर जाणार.”
“तुम्ही मिरचीचं झाड पाहिलं असेल. मिरचीच्या झाडाला येणारी फुलं कधीच तिखट असतात. हे उदाहरण सांगायचा इतकाच हेतू की, आई सेक्स वर्कर आहे म्हणून माझी मुलं सेक्स वर्कर होणार नाहीत याची जबाबदारी मी घेतली. म्हणून ते माझं ‘आजीचं घर'”. गौरी सावंत त्यांच्या ‘आजीचं घर’ या संस्थेमार्फत अनेक मुलींना घडवत आहेत.