त्या दिवशी रंगभूषाकार उल्लेश खंदारे यांचा फोन आला : ‘आपले बोरकरकाका गेले. फसवलं हो त्यांनी मला. मला पुण्याला जा म्हणाले, आणि आपण मात्र न सांगताच कायमचे निघून गेले.’ रडवेल्या आवाजात त्यांनी ही बातमी सांगितली आणि क्षणभर सुन्न व्हायला झालं. खरं तर बोरकरांच्या आजाराची कल्पना असूनही अचानक आलेल्या या बातमीनं धक्का बसलाच. गेली सत्तरहून अधिक वर्षे रंगभूषेच्या क्षेत्रात लक्षवेधी योगदानामुळे नाटय़सृष्टीला सुपरिचित असलेले कृष्णा बोरकर अलीकडेच संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित झाले होते. त्यावेळी या गुणी, परंतु उपेक्षित कलावंताचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला याचे खूप समाधान वाटले होते.
कृष्णा बोरकर यांची नाटकाच्या निमित्ताने अधूनमधून भेट होई. पाहिलेल्या नाटकावर त्यांच्याशी क्वचित थोडी चर्चाही होई. नाटकात त्यांना जाणवलेल्या त्रुटी वा उणिवा ते सहज बोलून दाखवीत.. अगदी त्यांनी स्वत: रंगभूषा केलेल्या नाटकातल्याही! याबाबतीत ते परखड व स्पष्टवक्ते होते. एखाद्याला कमी लेखायचं म्हणून नव्हे, तर खरोखरच त्या त्रुटी त्यांना नाटकात जाणवलेल्या असत. नाटय़सृष्टीतील प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांच्या त्या लक्षात येत.
रंगभूषाकाराची आणि एकूणच पडद्यामागच्या कलावंतांची आपल्याकडे नेहमीच उपेक्षा होत आलेली आहे. त्यांचं तुटपुंजं मानधन हा सर्वाच्या चर्चेचा विषय असला तरी रंगभूमीच्या सेवेच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या निर्मात्यांनी स्वत:हून कधी ते वाढवण्याचा प्रयत्न केल्याचे मात्र आढळले नाही. आजही त्यांची हीच स्थिती कायम आहे. अशा कायम उपेक्षित, शोषित आणि वंचित व्यवसायास बोरकर का चिकटून राहिले असतील, असा विचार कधीमधी मनात येई. एकदा तसं मी बोलून दाखवलं तर म्हणाले, ‘इतर कसलीच कला अंगी नसल्याने दुसरं करणार तरी काय? बरं, गाठीशी शिक्षणही नाही. तेव्हा जे येतं ते करत राहण्यावाचून पर्याय नव्हता. आणि त्यात मला नाटकाची जबर पॅशन होती.. आजही आहे. त्यामुळे हा व्यवसाय सोडून दुसरं काही करावं असं कधी मनातही आलं नाही.’
कृष्णा बोरकर कोकणातले. त्यांच्या न कळत्या वयातच वडील गेल्याने पोटासाठी त्यांची आई त्यांना घेऊन मुंबईत आली. गिरणगावच्या वस्तीत वास्तव्य असल्याने साहजिकच भोवतालच्या नाटकवाल्या मंडळींशी छोटय़ा कृष्णाची गाठ पडली. गिरणी कामगारांच्या नाटकांतून त्यांना लागेल ती मदत करण्यात कृष्णाला आनंद मिळे. शिक्षण सुटलं होतंच. वयाच्या ११ व्या वर्षांपासून नाटकवाल्यांतच उठबस सुरू झाली. एकदा ‘आग्य््रााहून सुटका’ या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी नाटक बघायला मिळालंच; वर बॅकस्टेजला मदत केल्याबद्दल आठ आणेही हातावर टेकवले गेले. याचा त्यांना साहजिकच आनंद झाला. हौसेखातर केलेल्या मदतीचे पैसेही मिळतात, हा साक्षात्कारही त्यांना झाला. पुढली दहाएक वर्षे आजूबाजूच्या नाटकवाल्यांना पडेल ती मदत ते करीत राहिले.. मानधन न मिळूनही! नंतर घरच्यांनी त्यांच्या या लष्करच्या भाकऱ्या भाजण्यास विरोध केला. तेव्हा ते घराबाहेर पडले. एका स्टुडिओत हरकाम्याचं काम मिळालं.
दरम्यानच्या काळात चित्रपटांचे आगमन झाल्यामुळे नाटकधंद्यात मंदी आली होती. नाटकांत काम करणारे कलाकार बेकार झाले होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी तेव्हा नावाजलेल्या कलाकारांना घेऊन नाटकांचे संयुक्त प्रयोग लावण्याची नवी शक्कल लढविली गेली. या प्रयोगांतून मा. दत्ताराम, नानासाहेब फाटक, बाबूराव पेंढारकर, मा. नरेश, हिराबाई बडोदेकर अशी तेव्हाची नामांकित नटमंडळी काम करत. या कलावंतांना कॉस्च्युम देणे वगैरे सटरफटर कामं बोरकर करीत. या दिग्गज कलावंतांचा सहवास मात्र त्यांना बरंच काही देऊन गेला. त्यांचा रंगभूषेच्या क्षेत्रातला प्रवेश मात्र योगायोगानेच झाला. गोव्याचे एक कलावंत वसंतराव सावकार यांना रंगभूषेच्या वेळी आपली मिशी लावता येईना. तेव्हा बोरकरांनी त्यांना ती लावून दिली. हे मा. दत्ताराम यांनी पाहिलं आणि त्यांनीही मग बोरकरांकडून मिशी लावून घेतली. या मुलाला रंगभूषेत गती आहे हे त्यांच्या लक्षात आलं. मग बोरकरही रंगभूषेत रस घेऊ लागले. पांडुरंग हुले हे त्यांचे या क्षेत्रातले पहिले गुरू. त्या काळात पौराणिक आणि ऐतिहासिक नाटकेच प्रामुख्याने होत असल्याने त्यांची रंगभूषा करण्याचा दांडगा अनुभव त्यांना मिळाला. त्यातून रंगभूषेचे अनेक तंत्र-मंत्र त्यांना शिकायला मिळाले.
काही दिवस ते फिल्मिस्तान स्टुडिओतही साहाय्यक म्हणून कामाला होते. तिथे रंगभूषाकार बाबा वर्दम यांनी त्यांच्यातला हुन्नर ओळखून त्यांना व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत घेऊन गेले. ‘दो ऑंखे बारह हाथ’ आदी चित्रपटांसाठी त्यांनी वर्दम यांचे साहाय्यक म्हणून तिथं काम केलं. राजकमलमध्ये त्यांना चित्रपटाशी संबंधित अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. व्ही. शांताराम यांच्यासारख्या प्रतिभावान कलावंत-दिग्दर्शकाचा सहवास त्यांना नकळतपणे बरंच काही शिकवून गेला. पण फार काळ ते चित्रपटांच्या दुनियेत रमले नाहीत. पुनश्च ते नाटकांकडे वळले. निर्माते मोहन वाघ यांच्या ‘चंद्रलेखा’ या संस्थेच्या स्थापनेपासून ते रंगभूषाकार म्हणून त्यांच्याकडे काम करू लागले. तत्पूर्वी ‘नाटय़संपदा’ तसंच अन्य काही संस्थांमध्येही त्यांनी रंगभूषाकार म्हणून काम केलं. ‘चंद्रलेखा’मध्ये मात्र ते ती बंद होईतोवर होते. ‘दीपस्तंभ’, ‘गुड बाय डॉक्टर’, ‘स्वामी’, ‘गगनभेदी’, ‘छावा’, ‘ऑल द बेस्ट’, ‘रणांगण’ या व्यावसायिक नाटकांपासून ते मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये संचालक प्रा. वामन केंद्रे यांच्या ‘प्रिया बावरी’, ‘मध्यमव्यायोग’सारख्या प्रयोगशील नाटकांपर्यंत अनेक नाटकांच्या रंगभूषेची धुरा बोरकरांनी यशस्वीरीत्या सांभाळली. नाटकाच्या मागणीनुसार रंगभूषेत त्यांनी आपल्या परीने प्रयोगही केले. ‘गुड बाय डॉक्टर’ या नाटकाच्या रंगभूषेसाठी नाटय़दर्पणतर्फे प्रथमच ‘मेकअप मॅन ऑफ द इयर’ हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. ‘दीपस्तंभ’ मध्ये नायिकेच्या भाजलेल्या चेहऱ्याचा त्यांनी केलेला मेकअप् आजही अनेक रसिकांच्या स्मरणात आहे. ‘रणांगण’ नाटकात एकाच वेळी असंख्य पात्रांच्या रंगभूषेची तारेवरची कसरत त्यांनी लीलया पेलली. त्यांच्या रंगभूमीवरील या लक्षणीय कारकीर्दीचा नाटय़ परिषदेसह विविध संस्थांनी पुरस्काररूपाने गौरव केला. संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पातळीवरील सन्मान हा त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीतला बहुमानाचा सर्वोच्च तुरा होता.
कोणतंही औपचारिक शिक्षण गाठीशी नसताना कृष्णा बोरकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये विद्यार्थ्यांना अनेक वर्षे रंगभूषेचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांच्या अनेक नाटकांची रंगभूषाही केली. नाटय़शिबिरांमधूनही ते मार्गदर्शन करीत. उल्लेश खंदारे हा त्यांचा शिष्य आज त्यांचा वारसा पुढे नेत आहे. (त्यालाही संगीत नाटक अकादमीचा युवा रंगकर्मी पुरस्कार मिळाला आहे.)
रंगभूषेसंबंधीची त्यांची मतं पुस्तकी नव्हती, तर त्यांच्या प्रदीर्घ स्वानुभवातून बनलेली होती. ते म्हणत, ‘चेहरा सुंदर करणे म्हणजे मेकअप् नव्हे. तर व्यक्तिरेखेच्या मागणीनुसार त्या पात्राची रंगभूषा करणे यात रंगभूषाकाराचे खरे कसब आहे.’ अर्थात ही गोष्ट त्यांनी स्वत: आयुष्यभर कटाक्षाने पाळली.
नाटक वा सिनेमासाठी कलाकार निवडताना दिग्दर्शक संबंधित व्यक्तिरेखेसाठी तो योग्य आहे की नाही, याचा प्रथम विचार करत असतो. त्यामुळे कलावंताचा चेहरा हा त्या व्यक्तिरेखेशी ८० टक्के मिळताजुळता असाच निवडला जातो. उरलेली २० टक्के त्रुटी मग रंगभूषाकाराने भरून काढावयाची असते. म्हणूनच ‘टू मेक अप्’.. म्हणजे कलाकाराला संबंधित भूमिकेसाठी सर्वार्थानं योग्य करण्याची उरलेली जबाबदारी रंगभूषाकाराची आहे असं बोरकर मानत. ‘आपल्याकडे ‘मेकअप डिझाइनर’ ही संकल्पना अस्तित्वात नाही. परदेशात ती आहे. तिथे दिग्दर्शक आणि रंगभूषाकार यांच्या एकत्रित विचारातून व्यक्तिरेखेचा चेहरामोहरा निश्चित केला जातो. आपल्याकडे इतक्या खोलात रंगभूषेचा विचार होत नाही,’ अशी खंत ते बऱ्याचदा व्यक्त करीत. रंगभूषाकाराने नेपथ्य, प्रकाशयोजना आणि वेशभूषा यांच्याशी सुयोग्य मेळ घालत रंगभूषा कशी करायची, हे ठरवायचं असतं. खरं तर त्याला धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रादेशिक अशा चौफेर संदर्भाची जाण असणेही तितकेच गरजेचे आहे. परंतु इतक्या खोलात जाऊन रंगभूषेचा विचार केला जात नाही, हे त्यांना चांगलंच खटके. आपल्याकडे एकूणच रंगभूषेबद्दल कमालीची अनास्था आहे. परंतु बोरकरांना मात्र ‘चलता है’ वृत्ती बिलकूल खपत नसे. नव्या रंगकर्मीना रंगभूषेच्या क्षेत्रात येण्यात रस नाही याचं त्यांना खूप वाईट वाटे. या क्षेत्रातही हुन्नर दाखवायला बराच वाव आहे. पण आपला चेहरा सतत प्रकाशझोतात राहण्याचीच आस प्रत्येकाला लागून राहिलेली असते. त्यामुळे सगळेच जण अभिनयाकडेच वळू इच्छितात, असं ते खंतावून बोलत असत.
खरं म्हणजे रंगभूषेकडे तरुण मंडळी न वळण्याचं प्रमुख कारण म्हणजे या क्षेत्राला नसलेलं ग्लॅमर! शिवाय पैशाच्या दृष्टीनंही ते फारसं आकर्षक नाही. बोरकरांना हे माहीत नव्हतं अशातला भाग नव्हता. त्यांनी स्वत:ही हाच अनुभव गेली ७० हून अधिक वर्षे घेतला होता. पण त्यांना रंगभूषेची जी पॅशन होती त्यापुढे त्यांनी इतर गोष्टी नेहमी दुय्यम मानल्या. आयुष्यभर गरिबीने पाठ न सोडूनही त्यांनी त्याबद्दल कधी तक्रार केली नाही. मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातही ते आपला संसार टुकीनं करीत राहिले. आहे त्यात समाधान मानत राहिले. पण जिथे त्यांच्या स्वाभिमानाला धक्का बसला, तिथून मात्र ते तडक बाहेर पडले.
त्यांनी वयाची पंच्याऐंशी गाठली असली तरी अनेकदा ते विद्यापीठातील नाटकाचा प्रयोग संपल्यावर तिथल्या बसस्टॉपवर बसची प्रतीक्षा करताना दिसत. नाटकाबद्दलची त्यांची ही पॅशन कधी कमी होणार, असा प्रश्न त्यांना पाहून पडे. अर्थात ती कधी कमी झाली नाही.. होणं शक्यच नव्हतं.