तेलुगू चित्रपट दिग्दर्शक त्रिनाध राव नक्कीना (Trinadh Rao Nakkina) यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘मजाका’च्या लॉन्च दरम्यान अभिनेत्री अंशू अंबानीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागितली आहे. दिग्दर्शक त्रिनाध राव नक्कीना यांच्यावर त्यांनी केलेल्या वक्त्यव्यानंतर प्रचंड टीका झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हैदराबादमधील टीझर लॉन्चवेळी राव म्हणाले की, २० वर्षांनंतर चित्रपटसृष्टीत परतणाऱ्या अंशू अंबानीला (Anshu Ambani) त्यांनी वजन वाढवण्यासाठी सांगितले होते. ते म्हणाले, “जेव्हा ती नायिकेच्या भूमिकेसाठी आली, तेव्हा मी विश्वास ठेवू शकलो नाही.कारण ती आता बारीक आहे. मी तिला फक्त थोडं खायला सांगितलं आणि वजन वाढवायला सांगितलं कारण तेलुगू प्रेक्षकांसाठी ते पुरेसं नाही. त्यांना सगळ्या गोष्टी मोठ्या आकाराच्या हव्या असतात.” असे वक्तव्य त्यांनी केले होते.

हेही वाचा…आमिर खानच्या ‘त्या’ सिनेमाला युवराज सिंगच्या वडिलांनी म्हटले ‘अतिशय फालतू’; बॉलीवूड सिनेमांवरही केली टीका, म्हणाले…

२००२ मधील ‘मनमधुडु’ चित्रपटाचा संदर्भ देत राव म्हणाले की, “त्या चित्रपटात अंशूला पाहिल्यावर प्रत्येकाला ती ‘लाडू’सारखी वाटली होती आणि ती पाहण्यासाठी आम्ही तो चित्रपट अनेक वेळा पाहिला.”

अभिनेत्री अंशूने काही काळासाठी चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला होता आणि आता जवळपास दोन दशकांनंतर ती पुन्हा पडद्यावर परतत आहे. राव यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका झाली. अनेकांनी त्यांच्या भाषणाला असभ्य म्हटले.

हेही वाचा…Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ

या विधानाच्या पार्श्वभूमीवर, राव यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आणि त्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. ते म्हणाले, ” ‘मजाका’च्या टीझर रिलीजच्या वेळी माझ्या बोलण्याचा उद्देश कोणालाही दुखावण्याचा नव्हता. मी फक्त सर्वांना हसवण्यासाठी बोललो. पण अनेक महिलांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे, मी मनापासून त्या वक्तव्याबद्दल माफी मागतो.”

यावर अभिनेत्री अंशू अंबानीने राव यांना यांची बाजू घेत, त्यांचे शब्द कदाचित चुकीच्या संदर्भाने घेतले गेले असतील. असे सांगितले. ती म्हणाली, “त्रिनाध सरांच्या वक्तव्यांबाबत काही चर्चा सुरू आहे. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की ते खूप प्रेमळ व्यक्ती आहेत. त्यांचे शब्द कदाचित चुकीच्या संदर्भात घेतले गेले असतील. त्यांनी मला कुटुंबातील सदस्यासारखं वागवलं आहे. मी या चित्रपटावर ६० दिवस काम केलं असून त्यांनी मला फक्त आदर, प्रेम आणि शुभेच्छा दिल्या आहेत.”

हेही वाचा…श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण

ती पुढे म्हणाली, “मला वाटतं आपण या गोष्टींवर पडदा टाकायला हवा. कारण मी या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी चित्रपट योग्य कारणांसाठी पाहायला हवा. त्रिनाध सरांबरोबर काम करणं माझ्यासाठी खूप चांगला अनुभव होता. मला तेलुगू चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्यासाठी त्यांच्यासारखा दिग्दर्शक मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे.” अंशूने पुढे सांगितले की, “मी त्यांच्या आणि संपूर्ण टीमप्रती फक्त प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करते. त्यांनी मला नेहमीच योग्य मार्गदर्शन केलं आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trinadha rao nakkina apologizes for controversial remarks on anshu ambani actress responded psg