साऊथ सुपरस्टार त्रिशा कृष्णन सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्रिशा लवकरच लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. मात्र, याबाबत अभिनेत्रीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.ॉ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “पंतप्रधान नक्कीच चिंतेत असतील”, कंगना रणौतचे नरेंद्र मोदींबद्दल विधान; म्हणाली, “त्यांना भीती वाटेलच कारण…”

त्रिशा कृष्णन एका मल्याळम निर्मात्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. मात्र, तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. तसेच तिच्या लग्नाची तारीखही जाहीर झालेली नाही. पण लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याआधीही अनेक वेळा त्रिशा कृष्णनने तिच्या लग्नाबद्दल उघडपणे भाष्य केले होते. त्रिशा म्हणालेली, की, अविवाहित असले तरी मी आनंदी आहे. सध्या मी लग्नाचा विचार करु इच्छित नाही. माझे लग्न जेव्हा व्हायचे असेल तेव्हा होईल. मला कसलीही घाई नाही.” काही जबाबदारीमुळे लग्न करायचं नसल्याचं अभिनेत्रीने म्हटलं होतं.

हेही वाचा- परिणीती चोप्राच्या हातावर रंगली राघव चड्ढा यांच्या नावाची मेहंदी, पहिला फोटो आला समोर

तृषा कृष्णनने २०१५ मध्ये बिझनेसमन वरुण मनियनसोबत साखरपुडा केला होता. मात्र, साखपुड्याच्या तीन महिन्यांनंतरच त्यांचे लग्न तुटले. यानंतर, अभिनेत्री २०२० मध्ये त्रिशा सिलांबरसन टीआरसोबतच्या लग्नाच्या अफवांमुळे प्रसिद्धीझोतात आली. त्रिशा आणि सिम्बूने ‘विनैतांडी वरुवाया’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. आता त्रिशा थलपथी विजय आणि दिग्दर्शक लोकेश कंग्रज यांच्याबरोबर ‘लिओ’ चित्रपटात दिसणार आहे.