बॉलिवूडचा ‘मुन्नाभाई’ अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त ही जरी चित्रपटांच्या झगमगाटापासून दूर असली तरीही ती आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. त्रिशाला दत्त ही तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर बरीच सक्रिय असते आणि आपली बोल्ड फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असले. त्रिशाला दत्तने पुन्हा एकदा बोल्ड अंदाजात मोनोकनीमधला आपल्या हॉटनेसचा तडका दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिता संजय दत्तप्रमाणे आपणही बॉलिवूडमध्ये झळकावं अशी त्रिशालाची ईच्छा नाही. मात्र तरीही तिचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. इतर स्टार किड्सप्रमाणे त्रिशालाने सुद्धा तिचं इन्स्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट ठेवलं आहे. पण तरीही 52 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. संजय दत्तची ३३ वर्षीय मुलगी त्रिशाला ही सध्या अमेरिकेत रहायला असते. ती एक सायकोथेरपिस्ट असून संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्माची मुलगी आहे.

(Photo: Instagram/trishaladutt)

त्रिशालाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंवर मोनोकनीमधले बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. मोनोकिनीमध्ये त्रिशाला अतिशय आकर्षक दिसत आहे. सुंदर बिकीनीमध्ये त्रिशाला बीच वाईब्स देत आहे. त्रिशाला नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत राहते. त्रिशाला अभिनेत्री नसली तरी, तिच्या ग्लॅमरस लुकची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते. त्रिशालाला सुट्ट्यांमध्ये फिरायला खूप आवडते. त्यामुळे ती अनेक देशांमध्ये फिरत असते. सध्या ती हवाईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय.

त्रिशालाने तिचे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. मास्टर डिग्री मिळविल्यानंतर तिने त्याच्या सेलिब्रेशनचे बरेचसे फोटो पोस्ट केले होते. त्रिशालाने होफ्स्ट्रा विद्यापीठात तिचे शिक्षण घेतले आहे. या अगोदर तिने न्यू यॉर्कच्या जॉन जे कॉलेज ऑफ क्रिसमिनल जस्टिसमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्रिशाला संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाउसची जबाबदारी सांभाळणार अशी चर्चा देखील सुरू होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trishala dutt chills on the hawaiian beach in a stunning one shoulder monokini prp