बॉलीवूडमध्ये सध्या घटस्फोट आणि ब्रेक-अपच्या चर्चांना उधाण आले आहे. दोन दिवसांपूर्वीच सलमानचा मोठा भाऊ आणि अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी मलायका अरोरा विभक्त होणार असल्याची बातमी होती. यावरून अजून पडदा उठत नाही तोचपर्यंत सलमानचा लहान भाऊ सोहेल खान हा त्याच्या पत्नीपासून विभक्त होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा यांच्या नात्यात कडवेपणा आला असून, याला अभिनेत्री हुमा कुरेशी जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. क्रिकेट लीगची ब्रँड अँम्बेसेडर असलेली हुमा कुरेशी आणि सोहेल खानमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, हुमा कुरेशीने हे वृत्त फेटाळले आहे. एका मायक्रोब्लॉगिंग साइटवर हुमाने या बातमीने काहीही तथ्य नसल्याचे सांगत सोहेल हा आपल्या मोठ्या भावासारखा असल्याचे तिने म्हटले. दरम्यान, सोहेलची पत्नी सीमा हिनेदेखील सोहेल आणि हुमामध्ये असे काहीही नसल्याचे सांगितले.
सलमानच्या ‘खान’दानात चाललंय तरी काय?
'खान'दानाबाबत नवी चर्चा सुरु झाली आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
First published on: 01-02-2016 at 16:12 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trouble in sohail and seema khans marriage