छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. त्यात ‘बिग बॉस मराठी’चे ही लाखो चाहते आहेत. ‘बिग बॉस मराठी’चे हे ३ पर्व सुरु झाले आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होताच या शोने प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेतलंय. शो सुरु होताच स्पर्धकांमध्ये ओठाताण सुरु झाली आहे. त्यात यंदाच्या पर्वात कलाकार, राजकारणी ते किर्तनकार आणि समाजसेवकांपर्यंत वेगवेगळे लोक स्पर्धक असल्याचे दिसत आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि किर्तनकार शिवलीला पाटील यांच्यात इंदुरीकर महाराजांवरून वाद झाला आहे.
‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात तृत्पी, शिवलीला पाटील, सुरेखा कुडाची आणि मीनल शाह छान गप्पा मारत होत्या. त्यावेळी इंदुरीकर महाराज यांचा विषय निघाला आणि शिवलीला म्हणाल्या, ‘तृप्ती यांनी इंदुरीकर महाराजाच्यांविरोधात केस केली होती.’ यावर उत्तर देत ‘इंदुरीकर महाराजांची किर्तन महिलांचा अपमान करणारी असतात. आमच्या आंदोलनानंतर युट्यूबवरून जवळपास ८० टक्के किर्तनाचे व्हिडिओ डिलीट केली. कारण तेव्हा आम्ही मोहीमच सुरु केली होती, त्यावेळी संपूर्ण जिल्हा माझ्या विरोधात होता,’ असे तृप्ती म्हणाल्या.
आणखी वाचा : करीनाने शेअर केला बिकिनीमधील मिरर सेल्फी; कॅप्शनमध्ये म्हणाली, “चला उन्हाळा…“
आणखी वाचा : नागा चैतन्यच्या ‘पहिल्या पत्नी’ विषयी समांथाने केला होता खुलासा
पुढे तृप्ती म्हणाल्या, ‘महिलांनी फेटा घालू नये, असे इंदुरीकर महाराज म्हणाले होते. महिलांनी फेटा घातला तर आम्ही काय गाऊन घालायचं का? त्यांनी केलेलं हे विधान चुकीचं होतं. शिवलीला देखील किर्तनाचे अनेक कार्यक्रम करताना फेटा घालतात, अनेक ठिकाणी फेटा घातला जातो त्यात चुकीच असं काय?’ हे ऐकल्यानंतर शिवलीला म्हणाल्या, ‘मी फक्त किर्तन करताना फेटा घालते, इतरवेळी नाही.’