गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री पूजा सावंत चर्चेत आहे. या चर्चा पूजा आणि अभिनेता गश्मीर महाजनीचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे सुरु झाल्या होत्या. या चॅटवरुन ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता त्या चॅट मागचे सत्य समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूजा आणि गश्मीरचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘लव्ह यू मित्रा’ असे आहे. या चित्रपटात पूजा आणि गश्मीर मुख्य भूमिकेत दिसणार असून इतर कोणते कलाकार दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नुकताच पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे मोशन पोस्टर शेअर करत तिने ‘मित्र ही एक अशी व्यक्ती असते जी कायम आपल्यावर निरपेक्ष प्रेम करते… लव्ह यू मित्रा’ असे कॅप्शन दिले आहे.

काही दिवसांपूर्वी पूजा आणि गश्मीरचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या चॅटवरुन ते एकमेकांना डेट करत आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या. पण ते चॅट त्यांचा आगामी चित्रपट ‘लव्ह यू मित्रा’मधील असल्याचे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Truth behind pooja sawant and gashmir mahajan chat avb