‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घरा-घरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीनं त्यांच्या रिअल लाइफची नवी इनिंग सुरू करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अक्षया आणि हार्दिक यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. साखरपुड्याचे फोटो शेअर करताना अक्षयानं त्याला ‘अहा ऽऽऽ’ म्हणजेच तिनं दोघांच्याही नावाची आद्याक्षरं एकत्र करत तेच कॅप्शनसाठी हॅशटॅग म्हणून वापरला आहे.

Home buyers cheated in Kalyan Dombivli
कल्याण, डोंबिवलीत घर खरेदीदारांची फसवणूक
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा

याशिवाय राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीने देखील साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याने हे फोटो शेअर करताना त्याला, ‘अखेर साखपुडा पार पडला… #अहा ऽऽऽ’ असं कॅप्शन दिलं आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या साखरपुड्यानं चाहत्यांनाही सुखद धक्का बसला आहे. त्यांच्या या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांसह अनेक मराठी सेलिब्रेटींनी कमेंट करत त्यांना आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा- देवदर्शनाला गेलेल्या तनुश्री दत्ताच्या कारचा अपघात, पायाला झाली गंभीर दुखापत

दरम्यान ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. दोघंही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसले होते. त्यांच्यातील खास बॉन्डिंगची चर्चा अनेकदा सोशल मीडियावर झाली होती. मात्र त्यांनी याबाबत कधीच स्पष्टपणे भाष्य केलं नव्हतं. पण अखेर आता या जोडीनं आपल्या नात्याला नाव देत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

Story img Loader