झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून अभिनेत्री गायत्री दातारने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेमुळे गायत्री अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. गायत्रीचे चाहते आता तिला लवकरच रुपेरी पडद्यावर पाहू शकणार आहेत. कारण आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने ती रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे.

‘कोल्हापूर डायरीज’ या चित्रपटात गायत्री मुख्य भूमिका साकारणार आहे. सुपरहिट ठरलेल्या मल्याळम ‘अंगमली डायरीज’ चित्रपटाचा हा मराठी रिमेक आहे. यामध्ये अभिनेता भूषण नानासाहेब पाटील मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाबद्दल एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत गायत्री म्हणाली, ‘कोल्हापूर डायरीज या चित्रपटात प्रेक्षक मला एका वेगळ्याच भूमिकेत पाहतील. आतापर्यंत मी ज्या साध्या इशा निमकरची भूमिका साकारली, त्याच्या एकदम विरुद्ध अशी चित्रपटातील भूमिका आहे. कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या एका मुलीची ही भूमिका आहे.’

अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘कोल्हापूर डायरीज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जो राजन यांनी केले आहे. गायत्री आणि भूषणसोबतच यामध्ये महेश शेट्टी खलनायकाच्या भूमिकेत आहे. नायक आणि खलनायक या दोन्ही पात्रांचा लूक प्रदर्शित झाल्यावर आता प्रत्येकाला गायत्रीच्या लूकची उत्सुकता आहे.

Story img Loader