‘झी मराठी’ वाहिनीवरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ‘तुला पाहते रे’ मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. मालिकेचं उत्तम कथानक आणि कलाकारांचं अभिनय या गोष्टींमुळे ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या मालिकेत जालिंदरच्या एण्ट्रीनंतर आता आणखी एक महत्त्वपूर्ण कलाकाराची एण्ट्री होणार आहे. विक्रांत सरंजामेच्या पत्नीची भूमिका प्रेक्षकांसमोर उलगडली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तुला पाहते रे’ ही मालिका नियमितपणे बघणाऱ्यांसाठी कदाचित हा आश्चर्याचा धक्का नसेल. कारण मालिकेच्या शीर्षकगीतात तिची झलक पाहायला मिळतेच. पण आता विक्रांत सरंजामेच्या पत्नीची स्पष्ट ओळख प्रेक्षकांना होणार आहे. ही भूमिका साकारणार आहे अभिनेत्री शिल्पा तुळस्कर. शिल्पाच्या एण्ट्रीने मालिकेत पुन्हा एक नवीन वळण येणार हे नक्की.

शिल्पा तुळस्कर

Video : लग्नानंतरच्या पार्टीत रणवीरचा खिल्जी अवतार

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार डिसेंबरच्या अखेरीस शिल्पा मालिकेत येणार आहे. विशेष म्हणजे विक्रांतचा शत्रू असलेल्या जालिंदरशी निगडीत तिची भूमिका असणार आहे. दुसरीकडे विक्रांत इशाला लवकरच प्रपोज करणार आहे. अशातच शिल्पाच्या एण्ट्रीमुळे मालिकेच्या कथानकात कमालीचं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tula pahate re vikrant saranjame wife to make an entry in serial subodh bhave gayatri datar
Show comments