अभिनेत्री तुनिषा शर्माने काल दुपारी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तिच्या अशा अचानक जाण्याने सर्वजण दुःख व्यक्त करत आहेत. सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत होती. या मालिकेमुळे तिला वेगळी ओळख मिळाली. ४ जानेवारी २०२३ रोजी तिचा २१वा वाढदिवस असणार होता. परंतु त्याआधीच तिने या जगाला निरोप दिला. तिच्या करिअरमध्ये तिने नाव कमावलेच पण त्याबरोबरच कोट्यवधींची संपत्तीही कमावली.

काही मीडिया रिपोर्टनुसार, तिच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे. तर तिची आई, भाऊ आणि बहीण चंदीगडला राहतात. तुनिषाचाही जन्म चंदीगड येथेच झाला होता. तेथे तिचे शालेय शिक्षणही झाले आणि नंतर अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

आणखी वाचा : “एक मुलगी कशी काय…” तुनिषा शर्माच्या आत्महत्येबाबत प्रसिद्ध अभिनेत्याने व्यक्त केला संशय

तुनिषाला नृत्य आणि अभिनयाची आवड होती. त्यामुळे तिने याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. बालकलाकार म्हणून तिने तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू केला होता. फक्त मालिकेतच नाही तर मोठ्या पडद्यावरही ती अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये झळकली. ‘भारत का वीर पुत्र-महाराणा प्रताप’ या मालिकेतून तिने अभिनयात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तुनिषाने शर्माने ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ या चित्रपटांमध्ये तरुण कतरिना कैफची भूमिका साकारली होती.

या तिच्या संपूर्ण करिअरमध्ये तिने नाव तर कमावलच आणि त्याचबरोबर मोठी संपत्तीही कमावली. एका मीडिया रिपोर्टनुसार तुनिषाची संपत्ती ही २ मिलियन डॉलर म्हणजेच जवळजवळ १५ कोटींची आहे.

हेही वाचा : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या! वसईमध्ये मालिकेच्या सेटवरच घेतला गळफास

तुनिषा शर्माने सहकलाकाराच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचं समजत आहे. तुनिषा मागच्या काही दिवसांपासून नैराश्यात होती आणि तिने त्यातूनच जीवन संपवलं अशीही माहिती समोर आली. तर ‘फ्री प्रेस जर्नल’ने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तुनिषा गर्भवती होती आणि तिच्या प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या केली. पोलीस तिच्या आत्महत्येचा तपास करत आहेत.

Story img Loader