टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी तिचा बॉयफ्रेंड शीझान खानला पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी रोज नवे खुलासे होताना दिसत आहेत. तुनिषा शर्माच्या आईने तिचा कथित बॉयफ्रेंड शिझान खान आणि त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता तुनिषाचा मामा पवन शर्माने याबद्दल भाष्य केले आहे.
तुनिषाचा मामा म्हणून माध्यमांसमोर येणारा पवन शर्मा हा तिचा मामा नसल्याचा दावा शिझानच्या कुटुंबाने केला आहे. तो तिचा मामा नव्हे तर तिचा मॅनेजर होता, असं त्यांनी सांगितलं. याबद्दल पवन शर्माने ‘दैनिक भास्कर’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत पवन शर्मा यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
आणखी वाचा : तुनिषा शर्माच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला? कारण आले समोर
“शिझानने तुनिषाला धर्मांतर करण्यास भाग पाडले. तुनिषाच्या वागण्यात फार बदल झाला होता. तिने तिच्या आईलाही याबद्दल सांगितले होते. फक्त तुनिषाची आई किंवा तिचे कुटुंबिय नाही तर तिच्याबरोबर काम करणारे अनेक कलाकारही हा दावा करत आहेत. तिचा ड्रायव्हरही याबद्दल बोलत होता. सध्या पोलीस याचा सर्व बाजूने तपास केला आहे”, असे पवन शर्मा यांनी सांगितले.
त्याबरोबरच शिझानच्या कुटुंबियांनी तुनिषाच्या आईवर अनेक आरोप केले आहेत. तुनिषाच्या आईने तिचा मोबाईल फोडला, तिचा छळ केला असाही आरोप त्यांनी केला आहे. या आरोपावर बोलताना पवन शर्मा यांनी ते फेटाळाले आहेत. “तुनिषाची आई तिचा अजिबात छळ करत नव्हती. त्याउलट तुनिषाची आई ही एकमेव व्यक्ती होती, जिच्या ती फार जवळ होती. तुनिषाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्या दोघी एकमेकांच्या फार जवळ होत्या”, असेही त्यांनी म्हटले.
आणखी वाचा : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण: शिझानच्या मेकअप रुममध्ये सापडली चिठ्ठी, त्यावर लिहिलंय…
“मी तुनिषाच्या आईला गेल्या ८ वर्षांपासून ओळखतो. तिची आई मला भाऊ मानतो. त्या मला राखी बांधतात आणि नात्याने मी तुनिषाचा मामा आहे”, असेही पवन शर्मा यांनी म्हटले.
दरम्यान तुनिषा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. या मालिकेच्या सेटवरच तिने मेकअप रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. तिच्या जाण्याने मालिकाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.