सध्या बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर चर्चेत आहे. या चर्चा तुषार कपूरने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे सुरु झाल्या होत्या. पण या फोटोंमुळे तुषारला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे. त्याच्या या फोटोंवर अभिनेत्री सेलिना जेठलीने देखील मजेशीर कमेंट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तुषार कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बाथरुमधील सेल्फी काढून शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो शर्टलेट दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने कोणतेही कॅप्शन दिलेले नाही. पण नेटकऱ्यांना तुषारचा हा शर्टलेस फोटो आवडला नसल्याचे दिसत आहे. त्यांनी तुषार कपूरला वयावरुन ट्रोल केले आहे. एका यूजरने ‘गुरु, तू म्हातारा झालास’ असे म्हटले. तर दुसऱ्या एका यूजरने ‘म्हातारे दिसत आहेत रामू काका’ असे म्हटले आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट पाहिल्यानंतर अभिनेत्री सेलिना जेठलीने मजेशीर कमेंट केली आहे. ‘हमदर्द टॉनिक सिंकारा उपाय म्हणून चांगले आहे’ अशी कमेंट सेलिनाने केली आहे.

२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुझे कुछ कहे ना है’ या चित्रपटातून तुषारने करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तुषारसोबत अभिनेत्री करीना कपूर खान मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटासाठी तुषारला बेस्ट डेब्यू अॅक्टरचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्याने ‘गोलमाल’ या चित्रपटात काम केले आणि हा चित्रपट हिट ठरला. या चित्रपटाच्या सीक्वलमध्येही तुषार दिसला होता. त्यानंतर काही वर्षे तुषार चित्रपटसृष्टीपासून लांब असल्याचे पाहायला मिळाले. आता तुषार त्याच्या फोटोमुळे चर्चेत आहे.