‘शूटाऊट अॉट वडाला’च्या यशानंतर बॉलिवूडचा अभिनेता तुषार कपूर आता चित्रपटनिर्मिती क्षेत्रात उतरत आहे. त्यासाठी तो स्वत:ची निर्मिती संस्था सुरू करून लवकरच तो आपल्या संस्थेचे व पहिल्या चित्रपटाचे नाव जाहीर करणार आहे.
“माझी निर्मिती संस्था चित्रपट क्षेत्रात निश्चित वेगळा ठसा उमटवेल व सामान्य चित्रपटांची निर्मिती न करता, प्रेक्षकांना आवडणा-या चांगल्या व्यावसायीक चित्रपटांची निर्मिती करेल”, असे आपल्या महत्वकांक्षी चित्रपट निर्मिती संस्थेविषयी बोलताना तुषार म्हणाला.
सविस्तर माहिती अद्याप समोर यायची आहे. मात्र, सूत्रांनी सांगितल्यानुसार तुषार सध्या एका पटकथेवर काम करत आहे.

Story img Loader