छोट्या पडद्यावरील जोड्यांपैकी एकेकाळी अनेकांच्या मनावर राज्य करणारी जोडी म्हणजे अभिनेता राम कपूर आणि अभिनोत्री गौतमी कपूर. ‘घर एक मंदिर’ या मालिकेतू राम आणि गौतमी एकत्र झळकले होते. राम कपूर यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या अनेक अभिनेते आलिशान घर विकत घेत आहेत, मात्र राम कपूर यांनी चक्क कोट्यवधी रुपयांची गाडी विकत घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज स्टार्स लोकांकडे अनेक महागड्या गाड्या असतात. राम कपूर यांनी नुकतीच फेरारी कंपनीची गाडी विकत घेतली असून त्याची भारतातील किंमत ३.५० कोटी आहे. राम कपूर यांच्याकडे १. कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची Porsche 911 Carrera S गाडीदेखील आहे. आज फेरारी कंपनीच्या गाड्या सचिन तेंडुलकरपासून ते नागा चैतन्यसारख्या अभिनेत्यांकडे आहेत.

राम कपूर यांनी घेतलेल्या गाडीला ३. ८ लिटरचे इंजिन असून ६०० hp तर टॉर्क ७६० इतका आहे. ही गाडी ३.५ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास जाऊ शकते. राम कपूर यांनी घेतलेल्या या गाडीची सध्या सगळीकडे चर्चा आहे. सोशल मीडियावर या गाडीचा फोटो व्हायरल होत आहे. राम कपूर आणि गौतमीने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलंय. मात्र ‘घर एक मंदिर’ या मालिकेतील त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv actor ram kapoor buys new ferrari portofino convertible worth over rs 3 50 crore spg