छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये काम्या पंजाबीचं नाव आवर्जून घेतलं जातं. काम्या प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसते. तिचं खाजगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिलं आहे. विविध कारणांमुळे चर्चेत असणाऱ्या काम्याचा बेजबाबदारपणा आता समोर आला आहे. काम्याला पानीपुरी खाण्यासाठी एका दुकानाजवळ थांबली आणि त्याच दुकानामध्ये १ लाख रुपयाने भरलेलं पाकीट ती विसरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमका काय प्रकार घडला?
एका कार्यक्रमासाठी काम्या इंदौरला गेली होती. कार्यक्रम संपल्यानंतर तिला पानीपुरी खाण्याचा मोह आवरला नाही. म्हणूनच पानीपुरी खाण्यासाठी ती एका दुकानात थांबली आणि तिथेच १ लाख रुपये विसरली. याचबाबत ईटाइम्सशी बोलताना काम्याने सांगितलं की, “मी रविवारी इंदौरमध्ये एका कार्यक्रमासाठी गेली होती. कार्यक्रमानंतर घरी परत येत असताना माझ्या मॅनेजरने मला सांगितलं की मॅम इथे असलेलं छप्पन दुकान हे पानीपुरीसाठी प्रसिद्ध आहे. मलाही मोह आवरला नाही आणि आम्ही त्या दुकानामध्ये पानीपुरी खाण्यासाठी थांबलो. माझ्याजवळ असलेल्या पाकीटामध्ये १ लाख रुपये होते. तेच घेऊन मी गाडीमधून उतरले आणि दुकानामधील टेबलवर ठेऊन पानीपुरी खाल्ली. पण पानीपुरी खाण्यात आणि फोटो काढण्यात मी इतकी व्यस्त झाली की ते पाकीट मी तिथेच विसरले.”

आणखी वाचा – “हा चित्रपटही पाहणार नाही कारण…”, ‘लाल सिंह चड्ढा’चा ट्रेलर पाहून संतापले लोक

काम्या पानीपुरी खाऊन तिथून निघून गेली आणि हॉटेलवर पोहोचताच आपल्याकडे १ लाख रुपये नसल्याचं तिच्या लक्षात आलं. पुढे घडलेल्या प्रकाराबाबत काम्या सांगते, “माझ्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा मी मॅनेजरला पुन्हा त्या दुकानामध्ये पाठवलं. मी अस्वस्थ झाले होते. मला माझे पैसे पुन्हा मिळणार का? हा प्रश्न सतत मला सतावत होता.

आणखी वाचा – Sidhu Moosewala Top Songs : ‘या’ ५ सुपरहिट गाण्यांमुळे सिद्धू मूसेवाला यांचं बदललं नशिब

कारण त्या दुकानामध्ये खूप गर्दी असते. माझा मॅनेजर तिथे पोहोचताच त्याला मी ठेवलेल्या टेबलवरच पैसे मिळाले. माझ्या मॅनेजरने या पानीपुरीच्या दुकानाचे मालक दिनेश गुर्जर यांचे आभार मानले आणि तिथून निघाला. पण खरंच मला असं वाटतं इंदौरमधील लोक प्रत्यक्षात खूप चांगले आहेत. दुकानामध्येच काम्या १ लाख रुपये विसरल्याने तिची चांगलीच फजिती झाली होती.