अभिनेत्री श्वेता साळवे ही लवकरच आई होणार आहे. श्वेताने २०१२ साली तिचा प्रियकर हरमीत सेठी याच्याशी विवाह केला होता. या जोडप्याचे हे पहिलेच बाळ असणार आहे. मातृत्वाची चाहूल लागलेली श्वेता तिच्या या दिवसांचा पुरेपूर आनंद घेत असून बाहेरगावी सुट्टीचा आनंद घेताना दिसते. तिच्या बेबी बम्पचे सुंदर फोटोही तिने सोशल मिडीयावर शेअर केले होते. त्यानंतर आता तिने आपल्या न जन्मलेल्या मुलाला पत्र लिहले आहे. पजामा पीपल या संकेतस्थळासाठी लिहलेल्या ब्लॉग अंतर्गत तिने हे पत्र लिहलेय. या पत्रात श्वेताने लिहलेय की..
डियर बेबी,
आता सर्व काही तुझ्यावर आहे. जे काही होईल त्याला सामोरे जाण्यासाठी तुझी आई तयार आहे. मी तुला वचन देते की, काहीही झाले तरी मी सदैव तुझ्यासोबत असेन. गेल्या काही महिन्यांपासून माझा प्रत्येक श्वास तुझ्याशी जोडला गेला आहे. मी जे काही खाते त्यात तुझाही भाग आहे. मी नेहमी तुझी काळजी घेईन. मी तुझं पहिलं रडण ऐकण्यासाठी, तुझ्या नरम त्वचेला स्पर्श करण्यासाठी आतुर झाले आहे. तू मला स्ट्रेच मार्क, झोप न येणे आणि यासह शरिरामध्ये होणा-या अनेक बदलांविषयी तक्रार करताना ऐकल असशील, त्यासाठी मी तुझी माफी मागते. मी तुला वचन देते की, प्रसुतीनंतर आलेल्या सुरकुत्यांचा मला कधीच पश्चाताप होणार नाही. हे व्रण मी तसेच ठेवेन. याचा अर्थ असा होतो की तू माझ्या शरिराचा एक भाग आहेस आणि माझ्यासाठी तेच अधिक महत्त्वाचे आहे. मी संपूर्ण रात्र तुझ्यासोबत जागी राहेन. (तसेच तुझ्या बाबांनाही रात्रभर जागं ठेवण्याचा मी प्रयत्न करेन). माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला पूर्णत्व आणलं आहेस.
न जन्मलेल्या बाळाला अभिनेत्रीने लिहले पत्र
प्रसुतीनंतर आलेल्या सुरकुत्यांचा मला कधीच पश्चाताप होणार नाही.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
आणखी वाचा
First published on: 06-08-2016 at 13:08 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv actress shweta salve letter to unborn child