टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला आत्महत्या करत जीवन संपवलं. २० वर्षीय अलिबाबा: दास्तान ए कबूल मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी तुनिषाचा बॉयफ्रेंड शिझान खान पोलिसांच्या कोठडीत असून त्याची चौकशी सुरू आहे. तिच्या आत्महत्येच्या तीन दिवसांनी म्हणजेच २७ डिसेंबरला तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाच्या अंत्यसंस्कारावेळी तिला लाल रंगाचे कपडे परिधान करण्यात आले होते. पण तिला याच रंगाचे कपडे का परिधान करण्यात आले, याबद्दल विविध तर्क लावले जात आहे. मात्र नुकतंच याबद्दलचे उत्तर समोर आले आहे.

तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला ‘अलीबाबा दास्तान ए काबुल’ या मालिकेच्या सेटवर गळफास घेत जीवन संपवलं. तुनिषाच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबियांसह मित्र-मैत्रिणींनाही धक्का बसला. तिच्या आत्महत्येच्या तीन दिवसांनी म्हणजेच २७ डिसेंबरला तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाच्या अंत्यसंस्कारावेळी तिची आई कोलमलडून गेली होती. तनुषीच्या काकांनी तिला मुखाग्नी दिला. यावेळी तिचे अनेक सहकलाकार आणि सिनेसृष्टीतील मित्रमंडळीही उपस्थित होती. तुनिषाच्या अंत्यसंस्कारावेळी तिला लाल रंगाचे कपडे परिधान करण्यात आले होते, यामागचे कारण समोर आले आहे.
आणखी वाचा : “तुनिषा शर्माच्या आत्महत्येदिवशी…” प्रसिद्ध अभिनेत्याने व्यक्त केली खंत

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
bjp kirit Somaiya
“शरद पवारांना हिंदू म्हणायची लाज वाटत असेल तर त्यांनी सांगावं ते हिंदू नाहीत”, किरीट सोमय्यांचा घणाघात
Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी

तुनिषा शर्माचे काका पवन शर्मा यांनी ‘आज तक’शी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी तुनिषाच्या अंत्यसंस्कारावेळी लाल रंगाचे कपडे परिधान का केले यामागचे कारण सांगितले. तुनिषाला लाल रंग खूप आवडत होता. तिला लाल रंगाचे कपडे परिधान करण्याची आवड होती. त्यामुळेच आम्ही तिला लाल रंगाचे कपडे परिधान केले. विशेष म्हणजे तिला त्यावेळी परिधान केलेले कपडे हे तिचे आवडते होते. त्यामुळे आम्ही तिच्या अंत्यसंस्कारावेळी तिला लाल रंगाचे कपडे घातले होते, असे तिचे काका पवन शर्मा यांनी सांगितले.

आणखी वाचा : तुनिषा शर्माच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला? कारण आले समोर

दरम्यान तुनिषा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. या मालिकेच्या सेटवरच तिने मेकअप रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. तिच्या जाण्याने मालिकाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.