प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. वैशालीने इंदौरमधील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. मागच्या वर्षभरापासून ती इंदौरमध्ये राहत होती. वैशालीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर याप्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली. त्यानंतर तिची एक सुसाईड नोटही सापडली होती. त्यात तिने तिचा एक्स बॉयफ्रेंड राहुल नवलानी आणि त्याची पत्नी यावर गंभीर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वी वैशाली ठक्करच्या कुटुंबियांनी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यापूर्वी त्यांनी तिची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे.
टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येमुळे संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. २९ वर्षीय अभिनेत्रीने इंदौरमधील तिच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या मृत्यूनंतर वैशालीच्या कुटुंबियांनी तिची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे.
आणखी वाचा- ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम वैशाली ठक्करची आत्महत्या, सुसाईड नोट जप्त
वैशाली ठक्करच्या चुलत बहिणीने इंडिया टुडेशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, वैशालीला तिचे डोळे खूप आवडायचे. ती अनेकदा म्हणायची की, मृत्यूनंतर माझे डोळे दान करावे. तिने तिच्या आईलाही याबद्दल सांगितले होते. माझ्या सुंदर डोळ्यांना जग पाहता यावे, अशी इच्छा तिने व्यक्त केली होती. त्यामुळे रविवारी १६ ऑक्टोबरला तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी तिचे डोळे दान करण्यात आले.
आणखी वाचा- अभिनेत्री मनवा नाईकशी गैरवर्तन करणं कॅब चालकाला भोवले, २४ तासांच्या आत पोलिसांकडून बेड्या
दरम्यान वैशाली ठक्करने ‘ससुराल सिमर का’मध्ये अंजली भारद्वाज ही भूमिका साकारली होती. याशिवाय तिने ‘सुपर सिस्टर्स’, ‘विष या अमृत: सितारा’, ‘मनमोहिनी २’ या मालिकांमध्ये काम केलं होतं. वैशाली ठक्करने स्टार प्लसवरील सर्वाधिक काळ सुरू असलेल्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिने २०१५ ते २०१६ या काळात संजना ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ‘ये है आशिकी’मध्येही दिसली होती. ‘रक्षाबंधन’ ही तिची अखेरची मालिका होती.