कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस’ हा शो सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक मानला जातो. नुकतंच बिग बॉसचं १५ वं पर्व संपलं. अखेर काल बिग बॉसच्या १५ व्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा झाली. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही बिग बॉसच्या १५ व्या पर्वाची विजेती ठरली. तर प्रतीक सहजपाल फर्स्ट रनरअप ठरला. पण तेजस्वीला बिग बॉसचं विजेतेपद देण्यावर आता टीव्ही कलाकारांनी आक्षेप घेतला आहे. काही कलाकार तेजस्वीच्या बाजून बोलत आहेत तर काहींनी प्रतीकला पाठिंबा दिला आहे.
सुरुवातीपासूनच अनेकांना प्रतीक सहजपालच विजेता होईल असं वाटलं होतं. सोशल मीडियावर त्याला पाठिंबा देणारे ट्वीट ट्रेंड होत होते. यासोबतच प्रतीक बिग बॉस १५ चा विजेता व्हावा अशी काही टीव्ही सेलिब्रेटींची इच्छा होती. एकीकडे करण कुंद्रा देखील विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात असताना या सर्वांना मागे टाकत तेजस्वीनं मात्र विजेतेपदाच्या शर्यतीत बाजी मारली. त्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच काहींनी मात्र तिच्यावर टीकाही केली. एवढंच नाही तर तेजस्वीला विजेतेपद देण्यावर प्रश्नचिन्हही उपस्थित केलं गेलं. ज्यात टीव्ही कलाकारांचा समावेश आहे.
गौतम गुलाटीनं दिल्या तेजस्वीला शुभेच्छा
अभिनेता गौतम गुलाटीनं ट्विटरवरून तेजस्वीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं लिहिलं, ‘अभिनंदन तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा आणि प्रतीक सहजपाल यांनीही खूप चांगला परफॉर्मन्स दिला.’ तर बिग बॉस १३ ची सदस्य शेफाली जरिवाला हिनं मात्र प्रतीकसाठी ट्वीट करत, ‘प्रतीकनं सर्वांची मनं जिंकली’ असं लिहिलं आहे.
काम्या पंजाबीनं प्रतीकला म्हटलं विजेता
टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीनं बिग बॉसच्या विजेतेपदावर नाराजी व्यक्त केली आहे. तिनं प्रतीकला शुभेच्छा देताना लिहिलं, ‘तू विजेता आहेस आणि कायमच राहशील. तू खूप चांगलं परफॉर्म केलं. तुझा बिग बॉसच्या घरातील प्रवास आणि टास्क पूर्ण करण्याची पद्धत याने सर्वांना प्रभावित केलं. आयुष्यात नेहमीच पुढे जात राहा. खूप सारं प्रेम आणि शुभेच्छा.’
गौहर खानचा प्रतीक सहजपालला पाठिंबा
बिग बॉस १५ चं विजेतेपद घोषित झाल्यानंतर गौहर खाननं केलेल्या ट्वीटनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं. तिनं लिहिलं, ‘बिग बॉस १५च्या विजेत्याची घोषणा होत असताना स्टुडिओमधील शांततेनं सर्व काही स्पष्ट केलं होतं. बिग बॉसचा विजेता एकच आहे आणि संपूर्ण जगाने त्याला चमकताना पाहिले आहे. प्रतीक सहजपाल.. तू सर्वांची मनं जिंकली आहेस. बिग बॉसच्या घरात गेलेला प्रत्येकाला तू आवडला आहेस. लोकांनाही तू आवडतोस