छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रिद्धी डोगरा ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशनसेन्समुळे ओळखली जाते. रिद्धी सोशल मीडियावर सक्रिय असून ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, आता अचंबित करणारी एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे रिद्धी डोगरा ही माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांची भाची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरुण जेटली यांची पत्नी ही रिद्धीची आत्या आहे. त्यामुळे रिद्धी अरुण जेटली यांच्या अनेक कौटुंबिक कार्यक्रमात त्यांच्या सोबत दिसून आली आहे. रिद्धीचं आणि जेटली कुटुंबाचं हे नातं खूपच कमी लोकांना माहिती आहे. रिद्धीने तिच्या उत्तम अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली. रिद्धीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

रिद्धीला खरी प्रसिद्धी ही तिच्या मर्यादा या मालिकेतून मिळाली. आता पर्यंत रिद्धीमाने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी प्रत्येकाच्या लक्षात ही मर्यादा मालिकेतील रिद्धी आहे. रिद्धीने अभिनेता राकेश बापट सोबत लग्न केले होते. मात्र त्यांच हे नात यशवी ठरलं नाही. त्या दोघांनी काही काळानंतर घटस्फोट घेतला होता.

रिद्धीचा जन्म २२ सप्टेंबर १९८४ साली झाला आहे. रिद्धीने तिचं शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले आहे. रिद्धीला एक भाऊ आहे. अक्षय डोगरा असे त्याचे नाव असून तो सुद्धा छोट्या पडद्यावरिल एक लोकप्रिय अभिनेता आहे. रिद्धीने ‘लागी तुझसे लगन’, ‘दिया और बाती’, ‘सावित्री’, ‘माता के चरणो मे स्वर्ग’, ‘हॉरर नाईटस’, ‘सेवन’, ‘हिंदी है हम’, ‘झुमे जिया रे’ यांसारख्या असंख्य मालिकांमध्ये काम केलं आहे. रिद्धीची ‘द मॅरिड वुमन’ ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये रिद्धीसोबत मोनिका डोगराने मुख्य भूमिका साकारली आहे. ही सीरिज लेस्बियन संबंधांवर आधारित आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv serial actress ridhi dogra relative of politician arun jaitley dcp