टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘रामायण’मध्ये (२००८-०९) कुंभकर्णाची भूमिका साकारणारे टीव्ही अभिनेता राकेश दिवान यांचे रविवारी निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते.
चार दिवसांपूर्वी राकेश यांनी इंदौर येथील एका खासगी रुग्मालयामध्ये वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करून घेतली होती. २० एप्रिलला त्यांना शस्त्रक्रियेसाठी मोहक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपाचारांरम्यान रुग्णालयाकडून करण्यात आलेल्या निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे दिवाण यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. मात्र रुग्णालयाने हे अमान्य केले आहे. रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा राकेश यांच्यावर २३ एप्रिलला शस्त्रक्रिया झाली तेव्हा त्यांची प्रकृती व्यवस्थित होती. पण २४ एप्रिलला उच्च रक्तदाब आणि मेंदूसंबंधी समस्येत वाढ होऊन त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. राकेश यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले मात्र अपयश आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
राकेश यांची `ये रिश्ता क्या कहलाता है` या मालिकेतील स्वयंपाकीची भूमिकाही खूप गाजलेली आहे.
‘ये रिश्ता क्या केहलाता है’ मालिकेतील अभिनेता राकेश दिवान यांचे निधन
टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'रामायण'मध्ये (२००८-०९) कुंभकर्णाची भूमिका साकारणारे टीव्ही अभिनेता राकेश दिवान यांचे रविवारी निधन झाले.
First published on: 28-04-2014 at 11:28 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv show yeh rishta kya kehlata hai actor rakesh diwana dies