‘बिग बॉस’मधील प्रतिस्पर्ध्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. पण, टीव्ही कलाकार गुरदीप कोहली, प्रत्युषा बॅनर्जी आणि कुशल तंडन हे तिघेही यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. गुरदीप ‘संजीवनी’ या मालिकेत आणि ‘रावडी राठोड’ चित्रपटात तर प्रत्युषा ही कलर्स वाहिनीवरील ‘बालिका वधू’ मालिकेत झळकली होती. कुशल स्टार प्लसवरील ‘एक हजारो मै मेरी बेहना है’ या मालिकेत काम करत आहे. मात्र, कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने तिघांनीही याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
‘बिग बॉस’च्या सातव्या पर्वाचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा सलमान खानच करणार असून हा शो १५ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
‘बिग बॉस’मध्ये गुरदीप, प्रत्युषा आणि कुशल?
'बिग बॉस'मधील प्रतिस्पर्ध्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.
First published on: 18-08-2013 at 11:20 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tv stars gurdeep pratyusha kushal in big boss