भव्यतेला साजेशा वातावरणात ‘नच बलिये सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी डान्स शो’ च्या सहाव्या पर्वातील अंतिम सोहळयात टेलिव्हिजनवरील ऋत्विक आणि आशा नेगी या लोकप्रिय जोडप्याला विजेते म्हणून घोषित करण्यात आले. ऋत्विक आणि आशाच्या तीन महिन्यांच्या चमकदार कामगिरीचा चाहत्यांच्या बहुमताच्या आधारावर सोनेरी चषक देऊन गौरव करण्यात आला. देबिना- गुरमीत कौर , रिपु- शिवांगी आणि विनोद-रक्षा या अन्य तीन जोड्यांचा पराभव करत पवित्र रिश्ता फेम या जोडीने विजेतेपदावर आपली दावेदारी सिद्ध केली.
याचबरोबर या जोडप्याला रोख ३५लाख रूपये, रेनॉल्ड डस्टर कार आणि शादी के साईड इफेक्टस या चित्रपटाच्या सौजन्याने ऑस्ट्रेलियातील गोल्ड-कोस्ट टूरचे बशिस मिळाले आहे. या पर्वाच्या अगदी पहिल्या भागापासून आम्ही जिंकण्याच्या उद्देशानेच सर्वस्व पणाला लावून प्रत्येक नृत्याचे सादरीकरण करत होतो. एपिसोडगणिक वाढणा-या स्पर्धेतील आव्हानला सामोरे जाताना आम्हाला प्रत्येक नृत्यासाठी अधिकाधिक मेहनत करणे गरजेचे होत गेले. माझ्या जोडीदाराशिवाय हे सगळे अशक्य होते. आम्ही या स्पर्धेदरम्यान गाळलेल्या घाम आणि अश्रु या दोहोंचे चीज झाल्याची प्रतिक्रीया जिंकल्यानंतर उत्साहित असलेल्या ऋत्विकने दिली. या जोडीचे नृत्यदिग्दर्शक वैभव आणि भावना यानांही ५ लाख रूपये देऊन गौरविण्यात आले. सेलिब्रिटी स्पर्धकांच्या डोळयाचे पारणे फेडणा-या नृत्याविष्कांरांबरोबरच यापूर्वी कधीही न बघायला मिळालेल्या परीक्षक टेरेन्स लेविन्सच्या ‘हाये रामा ये क्या हुआ’ आणि ‘लहु मुहॅ लग गया’ या गाण्यांवरील सादरीकरणाने अंतिम सोहळ्याच्या कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली होती.
ऋत्विक आणि आशा नेगी ‘नच बलिये ६’चे विजेते
भव्यतेला साजेश्या वातावरणात 'नच बलिये सेलिब्रिटी डान्स रिअलिटी डान्स शो' च्या सहाव्या पर्वातील अंतिम सोहळयात टेलिव्हिजनवरील ऋत्विक आणि आशा नेगी या लोकप्रिय जोडप्याला विजेते म्हणून घोषित करण्यात आले.
First published on: 02-02-2014 at 11:10 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tvs hit couple rithvik and asha negi win nach baliye 6%e2%80%b2