विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट देशभरात चांगलाच गाजला. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं तुफान कमाई केली. एवढंच नाही तर त्यानंतर प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ देखील या चित्रपटासमोर टिकू शकला नाही. अशात काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली होती. तिनं आपल्या पोस्टमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ची खिल्ली उडवली होती. आता यावरून नेटकऱ्यांनी अक्षय कुमारला चांगलंच सुनावलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ट्विंकल खन्ना हिने काही दिवसांपूर्वी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्रात लिहिलेल्या एका कॉलममध्ये याबाबत भाष्य केले होते. यावेळी ट्विंकल खन्नाने विवेक अग्निहोत्रींच्या द कश्मीर फाइल्सवर प्रतिक्रिया देताना त्याची खिल्ली उडवली. ट्विंकल खन्ना म्हणाली, “सध्या अनेक चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्रींसोबत बरोबरी साधण्यासाठी विविध शहरांच्या नावावर चित्रपट बनवत आहे. तसेच या चित्रपटाची नावे रजिस्टर करण्यासाठी या निर्मांत्यांचीही धावपळही सुरु आहे.”

आणखी वाचा- ‘बियरसोबत शेव चालेल का?’ सोनू सूदनं दिली ऑफर; वाचा नेमकं काय घडलं

“मी सुद्धा आता ‘नेल फाइल’ नावाचा चित्रपट बनवण्याचा विचार करत आहे”, असेही म्हणत ट्विंकलने अप्रत्यक्षपणे द कश्मीर फाइल्सची खिल्ली उडवली. तसेच याबाबत मी माझी आई डिंपल कपाडियालाही सांगितले असेही तिने म्हटले. यावरून आता नेटकऱ्यांनी अक्षय कुमारला सुनावलं आहे. एका युजरनं कमेंट करताना लिहिलं, ‘अक्षय कुमारजी कृपया तुमच्या मूर्ख पत्नीला समजवा नाहीतर एक दिवस तिच्यामुळे तुम्ही रस्त्यावर याल. स्वतः तर फ्लॉप आहेच. काही काम नाही तर घरी बसून ती स्वतःचा मुर्खपणा सर्वांना दाखवून तुम्हाला लवकरच रस्त्यावर आणणार आहे. तिला समजवा.’

आणखी वाचा- Video: एक्स गर्लफ्रेंड कतरिनासमोर आलियानं रणबीर कपूरला केलं प्रपोज अन्…

दरम्यान काही काळापूर्वी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाबाबत केलेल्या एका ट्वीटमुळे अक्षय कुमार देखील नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला होता. त्यानं ‘द कश्मीर फाइल्स’वर प्रतिक्रिया दिली होती. त्यावरून स्वतःच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी अक्षय ‘द कश्मीर फाइल्स’च्या नावाचा वापर करत असल्याचं म्हणत नेटीझन्सनी त्याच्यावर टीका केली होती.