बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. रणवीर सिंगने काही दिवसांपूर्वीच केलेलं न्यूड फोटोशूट बरंच गाजलं होतं. रणवीरच्या या फोटोवर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता या सगळ्यांमध्ये अभिनेत्री ट्विंकल खन्नाचीही भर पडली आहे. ट्विंकल खन्नाने रणवीरच्या या फोटोशूटवर मजेदार प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. नुकतीच तिने रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर मजेदार प्रतिक्रिया दिली. ट्विंकल म्हणाली, “मी या फोटोशूटमुळे नाराज झालेल्या लोकांना सांगू इच्छिते की ‘द नेकेड ट्रस्ट’ फेलोशिप सुरू करण्यासाठी कोणाची वकिली करत नाही.”
आणखी वाचा- विजय देवरकोंडालाही करायचंय साराला डेट? म्हणाला “मी तिला मेसेज केला…”
आणखी वाचा- “तुमची इच्छा नसेल तर चित्रपट बघू नका, बहिष्कार कशाला?” अक्षय कुमारचा सवाल
आपला मुद्दा मांडत ट्विंकल पुढे म्हणाली, ‘या फोटोशूटमुळे भावना दुखावलेल्या महिलांची संख्या जास्त नाहीये. आमची एकच तक्रार आहे. रणवीर सिंगचे फोटो ओव्हर एक्सपोज करण्याऐवजी अंडरएक्सपोज असल्यासारखे वाटतात. भिंग, दुर्बीण आणि चष्मा लावून बघितल्यावरही मला काहीच दिसले नाही. मी फोटो झूम करूनही पाहिले पण मला काहीच दिसलं नाही आणि असं करत असताना माझा मुलगा आरव तिथे आला. मग मला स्वतःचीच लाज वाटली. कारण मला या फोटोंमध्ये काही आक्षेपार्ह आहे का शोधायचे होते जे सापडले नाही.
दरम्यान रणवीर सिंगच्या या फोटोशूटवरून बराच वाद झाला होता. यामुळे रणवीरच्या विरोधात एफआयआरही नोंदवण्यात आली होती.