बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ट्विंकल ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ट्विंकलने तिच्या आणि अक्षयच्या लग्नाची ज्योतिषीने केलेल्या भविष्यवाणी विषयी सांगितले. एवढचं काय तर जेव्हा ही भविष्यवाणी करण्यात आली होती, तेव्हा अक्षय कोण आहे हे देखील तिला माहित नव्हतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्विंकलने तिचा ट्विक इंडिया या शोमध्ये हजेरी लावलेल्या जॅकी श्रॉफसोबत चर्चा केली. तेव्हा भविष्यवाणी विषयी बोलत असताना ट्विंकलने सांगितले की तिचे वडील म्हणजे राजेश खन्ना यांना देखील एका ज्योतिषीने माझ्या लग्नाची भविष्यवाणी केली होती. “माझा ज्योतिषीवर विश्वास नाही पण माझे वडील मला सांगायचे…, ते ज्योतिषी नव्हते, पण त्यांच्या ओळखीचे एक ज्योतिषी होते आणि त्यांनी माझ्या लग्ना आधीच माझा पती कोण होणार याची भविष्यवाणी केली होती. त्यांनी सांगितले होते की तू अक्षय कुमारशी लग्न करशील. मी म्हणाली कोण? त्याच पूर्ण नाव काय आहे. त्यावेळी तर मी अक्षयला ओळखत सुद्धा नव्हती”, असं ट्विंकल म्हणाली.

आणखी वाचा : भावाच्या मृत्यूची वडिलांनी केलेली भविष्यावाणी ठरली खरी; जॅकी श्रॉफ यांनी केला खुलासा

पुढे ट्विंकल म्हणाली, “लग्नाच्या काही वर्षांनंतर माझे वडील त्या ज्योतिषीला माझ्या घरी घेऊन आले होते. मी लोकांना असे प्रश्न विचारत नाही असं म्हणतं म्हणाली, मी व्यवसाय करेल का? आणि त्यावर तो म्हणाला, ‘तू लेखिका होशील’आणि मी २० वर्षे काहीही लिहिले नाही.” मी म्हणाले, ‘माझ्या सजावटच्या व्यवसाया विषयी सांगा. तू मला दुसऱ्याच गोष्टी का सांगत आहात. मी लेखिका होईल काहीही आणि आता…”

आणखी वाचा : मालिकेत एकमेकींशी भांडणाऱ्या संजना आणि अरुंधति खऱ्या आयुष्यात मात्र…

ट्विंकलने आतापर्यंत तीन पुस्तके लिहिली आहेत. मिसेस फनीबोन्स, द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद आणि पायजामा इज फॉरगिव्हिंग. ट्विंकल अनेकदा तिचे विचार इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twinkle khanna says astrologer told rajesh khanna she would marry akshay kumar says did not know who he was dcp