सोशल मीडिया असो किंवा मीडिया कॉलम, ट्विंकल खन्ना बिनधास्तपणे लिहिते. आपल्या नव्या लेखात रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर कमेंट करताना तिने एक मजेदार प्रसंग सांगितला आहे. ट्विंकल खन्नाच्या सासूबाई म्हणजेच अक्षय कुमारच्या आईने एका नातेवाईकाला नग्न पाहिल्याचा किस्सा तिने आपल्या नव्या लेखात शेअर केला आहे. याशिवाय यावर तिची प्रतिक्रिया काय होती हेही तिने सांगितलं आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या कॉलममध्ये ट्विंकल खन्नाने, महिला आणि पुरुष यांच्या नग्न शरीरावर काय प्रतिक्रिया असतात किंवा त्यांची यावर काय मतं असतात याबद्दल लिहिले आहे. एकीकडे लोक महिलांच्या नग्न शरीराकडे सहजपण पाहतात, तर पुरुषांना अशाप्रकारे पाहणं महिलांना अस्वस्थ करतं. हे पटवून देताना ट्विंकलने तिच्या आयुष्यातली एक जुनी घटना सांगितली. तिच्या सासूबाई अर्थात अभिनेता अक्षय कुमारची आईसोबत ही घटना घडली होती.
आणखी वाचा- “मी झूम करून पाहिलं पण…” रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर ट्विंकल खन्नाची मजेदार कमेंट
ट्विंकलने लिहिलं, जेव्हा माझ्या सासूने एका पुरुषाला नग्नावस्थेत पाहिलं तेव्हा ती खूप अवघडली. ही घटना काही वर्षांपूर्वीची आहे. सासूबाईंनी ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलमधला फरक अजूनही कळत नसलेल्या आमच्या पॉम्मी नावाच्या नातेवाईंकांना व्हिडीओ कॉल केला होता. त्यांनी कॉलवर बोलत असताना बाथरूमचा दरवाजा उघडला. बाथरूममध्ये त्यांचा ७२ वर्षीय पती टॉवेल शोधत होता. त्या म्हणाल्या, मोहनजी फोन घ्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दीदीने मुंबईहून फोन केला आहे. यावर माझ्या सासूबाईंनी ताबडतोब कॉल डिस्कनेक्ट केला कारण मोहनजींना त्यांनी व्हिडीओ कॉलवर नग्नावस्थेत पाहिलं होतं.
आणखी वाचा- विजय देवरकोंडालाही करायचंय साराला डेट? म्हणाला “मी तिला मेसेज केला…”
दरम्यान याच लेखात ट्विंकलने अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवरही भाष्य केलं आहे. रणवीरच्या फोटोंमध्ये ओव्हर एक्सपोझिंग असं काहीच नव्हतं असं ट्विंकलं म्हटलं आहे. “मी त्याचा फोटो झूम करून पाहिला तरीही त्यात मला आक्षेपार्ह असं काहीच सापडलं नाही. मात्र हे करत असताना जेव्हा माझ्या मुलानं मला पाहिलं तेव्हा मात्र मला स्वतःचीच लाज वाटली.” अशी प्रतिक्रिया ट्विंकलने दिली आहे.