बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ट्विंकल ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील सोशल मीडियाच्या माध्यामातून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच ट्विंकलने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
ट्विंकले हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोत ट्विंकल तिच्या मुलीसोबत दिसत आहे. “एका आईला तिच्या मुलांच्या गृहपाठाबरोबरच त्यांच्या मनावर लक्ष ठेवायचे असते. तिने फक्त तिच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे आणि जेव्हा पण तिला कोणती गोष्ट विस्कळीत वाटते, तेव्हा तिने ते पुन्हा नीट करावे लागते आणि हे सगळं तिला दररोज करावं लागतं”, असे ट्विंकल म्हणाली.
आणखी वाचा : लग्नाला होकार देण्यापूर्वी कतरिनाने विकीसमोर ठेवली होती ‘ही’ एक अट
आणखी वाचा : ‘मला गालावर KISS दे…’, अभिजीत बिचुकलेने केली हद्द पार
पुढे ट्विंकल म्हणाली, “मी कदाचित परिपूर्णतेपासून दूर आहे आणि या जमातीतील इतर सदस्यांप्रमाणे मी त्या अपराधीपणाने जगत आहे, परंतु जर मी इतके करू शकते, ते पुरेसे आहे आणि कदाचित आपल्या सर्वांनाच तितके चांगले असणे आवश्यक आहे.”