‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या दोन चित्रपटांमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सारा अली खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. साराने नुकतंच फिल्मफेअर मासिकासाठी तिचं पहिलं फोटोशूट केलं असून त्यामुळेच तिची चर्चा होत आहे. या फोटोशूटमधील एका फोटोमुळे सोशल मीडियावर सारा ट्रोलिंगची शिकार झाली आहे.

फिल्मफेअर मासिकासाठी केनियात हे फोटोशूट झाले. यातल्या एका फोटोमध्ये साराच्या मागे एक आफ्रिकन व्यक्ती पारंपरिक पोशाखात पाहायला मिळत आहे. मासिकाद्वारे हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांनी त्यावर टीका करण्यास सुरुवात केली. साराचा हा फोटो अत्यंत चुकीच्या पद्धतीने फोटोशॉप केल्याचंही अनेकांनी म्हटलं. आफ्रिकन व्यक्तीला एखाद्या वस्तूप्रमाणे फोटोसाठी मागे उभं करून त्यांच्या संस्कृतीचा अपमान केल्याचीही टीका काहींनी केली. फोटोमध्ये साराची सावली तर आहे पण तिच्या मागे उभा असलेल्या आफ्रिकन व्यक्तीची सावली मात्र कशी नाही, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.

वाचा : मला अर्जुन आवडतो; मलायकाची जाहीर कबुली

साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर रणवीर सिंगसोबत ‘सिम्बा’ या चित्रपटात ती झळकली. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर १०० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला. सोशल मीडियावरही तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीपासूनच सारा चर्चेत आहे. त्यातच दोन हिट चित्रपटांनंतर तिला बऱ्याच जाहिराती आणि फोटोशूटचे ऑफर्स येऊ लागले. फिल्मफेअर या नावाजलेल्या मासिकासाठी तिने पहिलं फोटोशूट केलं. पण याच फोटोशूटमध्ये ती ट्रोल झाली.

Story img Loader