संगीतकार रिकी केज व सामाजिक कार्यकर्त्यां नीला वासवानी यांना ‘विंड्स ऑफ संसारा’ व मलाला युसुफझाई यांच्यावरील माहितीपट या दोन कलाकृतींसाठी ५७ व्या ग्रॅमी पुरस्कारात गौरवण्यात आले आहे.
न्यू एड अल्बम वर्गवारीत विंड्स ऑफ संसारा या केज यांच्या अल्बमला गौरवण्यात आले आहे. केज यांनी त्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील पावावादक वॉटर केलरमन यांच्याबरोबर सहकार्य केले होते. स्वशिक्षित संगीतकार केज या ३३ वर्षांच्या असून त्यांनी यापूर्वी कन्नड चित्रपटांच्या ध्वनिमुद्रिका केल्या आहेत. विंड्स ऑफ संसारा हा त्यांचा चौथा अल्बम आहे. भक्ती- पॉल अॅव्हगेरिनोज , रिच्युअल- पीटर केटर, सिंफनी लाइव्ह इन इस्तंबूल- किटारो व इन लव्ह अँड लाँगिंग- सिल्विया नकाच व डेव्हीड डार्लिग यांची त्यांना स्पर्धा होती.
वासवानी या व्हेअर द लाँग ग्रास बेंड्स या कथासंग्रहाच्या लेखिका असून त्यांना ‘यू हॅव गिव्हन मी अ कंट्री’ या त्यांच्या आठवणी प्रसिद्ध आहेत. त्यांनी पाकिस्तानी शिक्षण हक्क कार्यकर्ती मलाला युसुफझाई हिच्यावर तयार केलेल्या आय अॅम मलाला- हाऊ वन गर्ल स्टुड अप फॉर एज्युकेशन अँड चेंजड द वर्ल्ड या माहितीपटासाठी पुरस्कार मिळाला आहे. या अल्बममध्ये त्यांनी पुस्तकाचा ध्वनिमुद्रित भाग करून वापरला आहे. दिवंगत सतारवादक रविशंकर यांच्या कन्या अनुष्का शंकर यांना जागतिक उत्कृष्ट संगीत अल्बम गटात पुरस्कार मिळाला नाही. त्यांना तिसरे नामांकन होते. या वर्षी त्यांनी त्यांची सावत्र बहीण नोरा जोन्स हिच्यासह ट्रेसस ऑफ यू हा सातवा अल्बम सादर केला होता, तो द सन वोन्ट सेट या नोराच्या सुरावटीवर आधारित होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा