लॉस एंजेलिसमधील आपापल्या राहत्या लक्झरी अपार्टमेंटमध्ये गेल्या आठवड्यात दोन मॉडेल मृतावस्थेत आढळल्याची माहिती समोर आली आहे. लॉस एंजेलिस पोलीस विभागाच्या म्हणण्यानुसार ३१ वर्षीय मॉडेल मलीसा मूनी १२ सप्टेंबर रोजी तिच्या डाउनटाउन एलए अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. तिच्या निधनाच्या दोन दिवसांपूर्वी १० सप्टेंबर रोजी अधिकाऱ्यांना ३२ वर्षीय निकोल कोट्स तिच्या अपार्टमेंटमध्ये मृत आढळली होती. दोघींचे अपार्टमेंट जवळच होते. याबद्दल ‘इंडिपेंडंट’ने वृत्त दिले आहे.

प्रसिद्ध अभिनेत्याच्या १६ वर्षीय मुलीची आत्महत्या, राहत्या घरात घेतला गळफास

Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
women committed suicide pune, husband harassment,
पतीच्या छळामुळे दोन महिलांची आत्महत्या; कोंढवा, विमानतळ पोलिसांकडून गुन्हे दाखल

मलीसा मूनी ही बंकर हिल येथील तिच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. खरं तर कुटुंबियांचा तिच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता, त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि तपासात ती घरात मृतावस्थेत आढळली. लॉस एंजेलिस पोलीस विभागाने तिच्या मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू केला आहे आणि तिच्या मृत्यूसाठी जबाबदार व्यक्तीला ओळखण्यासाठी लोकांकडून मदत मागितली आहे.

पालकांच्या विरोधात जाऊन १८ व्या वर्षी लग्न अन् वर्षभरात घटस्फोट; सुनिधी म्हणाली, “माझ्याकडून चुका झाल्या, पण…”

बरोबर दोन दिवसांपूर्वी सकाळी १० च्या सुमारास तपासणी करण्यासाठी अधिकारी निलोक कोट्सच्या घरी गेले होते, परंतु कोणीही प्रतिसाद दिला नाही. दोन तासांनंतर तिच्या मृत्यूची बातमी पोलिसांना मिळाली. कोट्सच्या कुटुंबियांनी तिची हत्या झाल्याचा दावा केला आहे. कोट्सच्या एक नातेवाईक स्टीव्हन्स म्हणाल्या, “मला वाटतंय की तिची हत्या झाली आहे, कारण तिचा एक पाय लाथ मारण्याच्या मुद्रेत हवेत होता. ती काही आपल्या बेडवर झोपेतेच मेलेली नाही.”

तिची आई शेरॉन कोट्स केटीएलएला म्हणाली, “हा सगळा मूर्खपणा आहे. माझी मुलगी मेली आहे आणि मला तिच्याबद्दलच्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तिचा खून कोणी केला हे पोलिसांनी शोधून काढावे अशी माझी इच्छा आहे.” दरम्यान, दोन्ही मॉडेलच्या मृत्यूंचा एकमेकांशी संबंध आहे की नाही हे शोधण्यासाठी पोलीस काम करत आहेत, परंतु या प्रकरणांमध्ये अद्याप कोणताही संबंध आढळलेला नाही. दोघीही एकाच क्षेत्रात काम करत होत्या, त्यामुळे यांच्या हत्येत काहीतरी संबंध नक्कीच असू शकतो, असं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे.