काही दिवसांपूर्वीच राणी मुखर्जीने यशराज फिल्म्सचा सर्वेसर्वा आदित्य चोप्रा याच्याशी इटलीत आपला मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह केला. आदित्य चोप्राचा भाऊ आणि बॉलीवूड अभिनेता उदय चोप्रा आपल्या वहिनीची म्हणजेच राणी मुखर्जीची थट्टामस्करी करण्याची एकही संधी सोडत नाहीये. उदयने राणीला आता ‘भाभी व्हॉल्डेमोर्ट’ म्हणून हाक मारायला सुरूवात केली आहे. तसेच आदित्य आणि राणीला लग्नासाठी ट्विटरवर शुभेच्छा देताना उदय चोप्राने त्या दोघांचा उल्लेख व्हॉल्डेमॉर्ट आणि भाभी व्हॉल्डेमोर्ट असा केला आहे. निर्माता आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांच्यातील प्रेमप्रकरणाची गेली अनेक वर्षे इंडस्ट्रीत चर्चा सुरू होती. सोमवारी रात्री इटलीत काही मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह झाला.

Story img Loader