खासदार उदयनराजे भोसले यांचा उद्या २४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या उपस्थितीत ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उदयनराजे यांची हटके स्टाईल ही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तर त्यांना या कार्यक्रमात पाहत असताना त्यांच्या चाहत्यांनी पुष्पाचा डायलॉग म्हणण्याची विनंती केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट चर्चेत आहेत. या चित्रपटातील गाण्यावर आणि डायलॉगवर अनेक रिल व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. या सगळ्यात आता भाजपाचे खासदार खासदार उदयनराजे यांचा देखील पुष्पाच्या डायलॉगवरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी उदयनराजेंनी त्यांच्या हटके स्टाईलमध्ये “पुष्पा..पुष्पा राज, मैं झुकेगा नहीं साला..।” हा डायलॉग म्हणत तिथे उपस्थित असलेल्या चाहत्यांची मने जिंकली.

आणखी वाचा : ‘हा’ लोकप्रिय अभिनेता साकारणार ‘शक्तिमान’ ही भूमिका

https://www.youtube.com/shorts/upTJXHmJqRI

Viral Video : ‘कच्चा बदाम’ फेम भुबन बड्याकरने पंचतारांकित हॉटेलमध्ये केला लाइव्ह परर्फोमन्स, प्रेक्षक भारावले

https://www.youtube.com/shorts/5CN_LWOuMeE

आणखी वाचा : मलायकाला मुलगा अरहान आई म्हणून नाही तर ‘या’ नावाने मारतो हाक

दरम्यान, ‘पुष्पा’ या चित्रपटातील गाण्यांवर आधी क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर आणि त्याच्या मुलींचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. तर त्यानंतर विराट कोहलीचा क्रिकेटच्या मैदानातील व्हिडीओ व्हायरल झाला होता. ‘पुष्पा’ या चित्रपटाने सगळ्यांच वेड लावलं असं म्हणायला हरकत नाही. अनेक सेलिब्रिटींनी चित्रपटातील गाण्यावर आणि डायलॉग्सवर त्यांचे व्हिडीओ शेअर केले होते. ‘पुष्पा’ या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसली आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपट सुपर हिट ठरला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udayanraje bhosle viral video on pushpa movie dialogue dcp