ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचा १६ ऑक्टोबर रोजी ७५ वा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला बॉलीवूडकरांनी हजेरी लावली. रेखा, रानी मुखर्जी, रवीना टंडन, विद्या बालन, शिल्पा व शमिता शेट्टी, जॅकी श्रॉफ यांच्यासह अनेक दिग्गज याठिकाणी पोहोचले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयरा खानच्या सासूबाईंना पाहिलंत का? आमिर खानने केलं मराठमोळ्या विहीणबाईंचं कौतुक; म्हणाला, “प्रीतमजी…”

हेमा मालिनींच्या वाढदिवसाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे पोहोचल्या. त्या जया बच्चन व पद्मिनी कोल्हापुरेंबरोबर आल्या होत्या. तिघींनी एकत्र माध्यमांना पोज दिल्या. त्यानंतर गर्दीतून कुणीतरी रश्मी यांना ‘नमस्कार वहिनी’ असं म्हटलं. त्यावर त्यांनी वळून पाहिलं आणि उत्तर देत ‘नमस्कार’ म्हणाल्या. तसेच विचारपूस केली. रश्मी ठाकरे यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, हेमा मालिनींच्या वाढदिवसाच्या पार्टीची जोरदार चर्चा आहे. पार्टीमध्ये बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. हेमा मालिनी यांनी मुली ईशा व अहानाबरोबर केक कापला आणि त्यांना भरवला. यावेळी त्यांचे जावईदेखील तिथे होते.

वाढदिवसाला त्यांचे पती धर्मेंद्र देखील पोहोचले. त्यांनी हेमा यांना केक भरवला. तसेच पत्नी व मुलींबरोबर एकत्र फोटो काढले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray wife rashmi thackeray attended hema malini birthday party check video hrc