अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. त्यांना एकत्र काम करताना बघणं म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी मेजवानीच असते. नुकतंच त्यांचं ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर आलं आहे. या नाटकाचे सगळे प्रयोग सध्या हाऊसफुल सुरू आहेत. परंतु अशातच त्यांना या नाटकाचा एक प्रयोग रद्द करावा लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमेश कामत आणि प्रिया बापट हे दोघंही सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडिया वरून या नाटकाबद्दलचे अपडेट्स ते त्यांच्या चाहत्यांशी शेअर करत असतात. नुकताच त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला. हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी त्यांच्या नाटकाचा पुण्यातील प्रयोग रद्द केला आहे असं सांगत त्यामागचं कारणही सांगितलं. याचबरोबर त्या तिकिटांचं काय होणार याचीही माहिती त्यांनी सर्वांना दिली.

आणखी वाचा : “उमेशशी एखादी मुलगी फ्लर्ट करत असेल तर मी…”, प्रिया बापटचा खुलासा

या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, “जर त्याची गोष्ट या आमच्या नाटकाचा ७ सप्टेंबर रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे रात्री ९:३० वाजता प्रयोग होणार होता. पण काही अपरिहार्य कारणामुळे आम्हाला तो प्रयोग रद्द करावा लागत आहे. पण हाच प्रयोग यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे १४ सप्टेंबरला रात्री ९:३० वाजता होईल. ज्यांनी तिकीट काढली आहेत त्यांना १४ तारखेला तीच तिकीट वापरून नाटक बघता येईल. पण ज्यांना १४ तारखेला नाटकाला येणं शक्य होत नाहीये अशा सर्वांना त्या तिकिटाचे पैसे परत केले जातील. बुक माय शोकडून तुम्हाला एक मेसेज आला असेल. ज्यांना १४ तारखेला प्रयोगाला येणं शक्य होणार नाही त्यांनी तो रिफंड क्लेम करा आणि ज्यांना १४ तारखेला प्रयोगाला येणं शक्य होत आहे अशा सर्वांना आम्ही १४ तारखेला भेटू.”

हेही वाचा : दिग्दर्शक संजय जाधव यांनी पाहिलं उमेश-प्रियाचं ‘जर तरची गोष्ट’ हे नवीन नाटक, प्रतिक्रिया देत म्हणाले…

दरम्यान, या नाटकांमध्ये उमेश कामात आणि प्रिया बापट यांच्या व्यतिरिक्त आशुतोष गोखले आणि पल्लवी अजय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Umesh kamat and priya bapat starrer jar tar chi gosht drama show got cancelled rnv
Show comments