पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम हा लोकप्रिय गायक आहे. आतिफ अस्लमने भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना दुबईत श्रद्धांजली वाहिली आहे. आतिफने त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये लता मंगेशकर यांची गाणी गात त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तर नेटकऱ्यांनी आतिफची स्तुती केली आहे. त्यानंतर #UnbanAtifAslam हे हॅशटॅग ट्रेंड करायला लागलं आहे.

आतिफने कोका कोला अरेना लाइव्ह दरम्यान लता मंगेशकर यांची गाणी गात त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांची गाणी गाण्यापूर्वी आतिफ म्हणाला, “त्या आपल्यात नाही, पण त्यांची गाणी ऐकत मी माझे आयुष्य जगले आहे. मी त्यांना भेटलो नाही पण त्यांच्या गाण्यांसोबत जगलो आहे.” आतिफचे हे शब्द ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या होत्या.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Shashank Ketkar
‘मुरांबा’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण; व्हिडीओ शेअर करत शशांक केतकर म्हणाला, “खूप भावुक…”

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

त्यानंतर नेटकऱ्यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत #UnbanAtifAslam हे हॅशटॅग वापरलं आहे. एक नेटकरी म्हणाला, “या आवाजाला कसं बॅन करू शकता? त्या पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की संगीताला सीमा नसते.” दुसरा नेटकरी म्हणाला, “१६ वर्षे बॉलिवूडमध्ये योगदान दिलं आणि त्या बदल्यात त्याला काय मिळालं तर वाईट वागणूक. तर इथे हा आहे जो लताजींना श्रद्धांजली देत सगळ्यांना दाखवूण देतोय की त्याचा द्वेष करत राहा आणि तो सगळीकडे प्रेम पसरवणार.” तिसरा नेटकरी म्हणाला, “हे खूप सुंदर आहे. संगीताला सीमा नसते. आतिफसाठी खूप प्रेम आणि आदर”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी आतिफला पाठिंबा दिला आहे.

आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये जेसिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

आणखी वाचा : “करीना आणि करिश्माने मला वडील म्हणून दत्तक घ्यावे”, रणधीर कपूर यांनी व्यक्त केली इच्छा

आणखी वाचा : हिजाबचे समर्थन केल्यानंतर मिनी ड्रेस घातल्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना स्वरा भास्कर म्हणाली, मी हॉट दिसते…’

आतिफने २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जहर’ चित्रपटातील ‘वो लम्हे’ हे गाणं गायलं होतं. या गाण्यासाठी त्याला आयफा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हे गाणं सुपरहिट झालं आणि त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायली.

Story img Loader