ईद आणि सलमानचा हिट चित्रपट हे गेल्या काही वर्षांपासून एक समीकरणच तयार झालं आहे. यंदाच्या ईदला प्रदर्शित झालेल्या सलमानच्या ‘रेस ३’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांचा हिरमोड झाला. मोठी स्टारकास्ट, बिग बजेट चित्रपट पण कथेच्या बाबतीत ‘रेस ३’ फ्लॉप ठरला. ट्रेलरपासूनच ट्रोल झालेल्या या चित्रपटाचा आता चौथा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांनंतरही सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रेस ३’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली. पहिल्याच दिवशी २९.१७ कोटी रुपयांचा बक्कळ गल्ला जमवत ओपनिंगला सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला. त्यामुळे आता निर्माते ‘रेस ४’चा विचार करू लागले आहेत.

वाचा : आलियाच्या या गाण्याचा रणबीर झाला फॅन 

‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘दबंग ३’च्याही आधी ‘रेस ४’ला प्राधान्य देण्याचा विचार निर्माते करत आहेत. ‘दबंग ३’चं दिग्दर्शन प्रभूदेवा करणार असून २०१९च्या अखेरपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चिन्हं आहेत. पण त्यापूर्वीच ‘रेस ४’ मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ‘रेस ३’ची संपूर्ण स्टारकास्ट ‘रेस ४’मध्येही असेल. मात्र याचं दिग्दर्शन रेमो डिसूझाऐवजी दुसरं कोणीतरी करणार असल्याचं समजतंय.

‘रेस’ आणि ‘रेस २’च्या तुलनेत ‘रेस ३’ मात्र फिका पडला. तरीही बॉक्स ऑफीसवर या चित्रपट जोरदार कमाई करत आहे. म्हणूनच निर्मात्यांनी ‘दबंग ३’च्याही आधी ‘रेस ४’ प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unfazed by negative reviews salman khan moves on to race