बऱ्याच काळापासून लांबणीवर पडलेल्या ‘धर्मा प्रॉडक्शन’च्या ‘उंगली’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. २१ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे एका निवेदनाद्वारे चित्रपटकर्त्यांकडून सांगण्यात आले. करण जोहर निर्माता असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रेन्सिल डिसिल्व्हा यांचे असून, चित्रपटात इमरान हश्मी, कंगना राणावत, संजय दत्त, रणदीप हूडा, नेहा धुपिया आणि नील भूपालम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपट जवळजवळ पूर्ण झाला असून, सर्व कलाकारांवर चित्रीत होणारे चित्रपटातील एक गाणे चित्रीत होणे अद्याप बाकी आहे. सध्या पोस्ट-प्रॉडक्शननंतरचे काम सुरू आहे. याबाबत बोलताना डिसिल्व्हा म्हणाले, या गाण्यासाठी चित्रपटातील सर्व कलाकारांची आवश्यकता आहे. पुढच्या महिन्यात चित्रीकरण करण्याचे निश्चित केले आहे. चित्रपटातील कलाकार अन्य कामात व्यस्त असल्याने चित्रीकरणासाठी सर्वांना एकत्र आणणे कठीण जात आहे. या गाण्याचे चित्रीकरण झाले की चित्रपट पूर्ण होईल. (सौजन्य आयएनएस)

Story img Loader