विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आणि अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारखे प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. नुकतंच या चित्रपटाच्या टीमने केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यावेळी त्यांनी हा चित्रपट कसा वाटला याबाबत प्रतिक्रिया दिली.

अमित शाह यांनी नुकतंच याबाबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी अमित शाह म्हणाले, “आज कश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या टीमची भेट घेतली. या चित्रपटाच्या माध्यमातून काश्मिरी पंडितांचा त्याग, त्यांना झालेल्या असह्य वेदना आणि त्यांच्याच देशात त्यांना घर सोडून जावे लागले त्या संघर्षाचे सत्य संपूर्ण जगासमोर आलं आहे. हा एक अतिशय स्तुत्य प्रयत्न आहे.”

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
kopri pachpakhadi vidhan sabha election 2024
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

“द कश्मीर फाइल्स” हे सत्याचे धाडसी प्रतिनिधित्व आहे. यामुळे या अशा ऐतिहासिक चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, याद्वारे समाज आणि देशाला जागृत करण्याचे काम केले जाईल. हा चित्रपट बनवल्याबद्दल मी या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो”, असे अमित शाह म्हणाले.

अमित शाह यांच्या या प्रतिक्रियेनंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांचे आभार मानले. विवेक अग्निहोत्री यांनी या भेटीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यावर ते म्हणाले, “अमित शाह तुमच्या प्रोत्साहनाबद्दल खूप खूप धन्यवाद. काश्मिरी लोक आणि सुरक्षा दलांच्या मानवी हक्कांसाठी तुम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहात. यासाठी तुमचे विशेष कौतुक. शांत आणि समृद्ध काश्मीरसाठी तुमचा दृष्टिकोन मानवता आणि बंधुता मजबूत करेल.”

“कलम ३७० रद्द करण्याच्या धाडसी निर्णयानंतर अमित शाहांनी आता माणसांना जोडण्यास सुरुवात केली आहे. काश्मीर हे जगासाठी मानवतेचे आणि एकतेचे उदाहरण म्हणून उदयास येईल यात मला काहीही शंका नाही”, असे विवेक अग्निहोत्रींनी सांगितले.

‘द काश्मीर फाईल्स’ने ब्रेक केले बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड, सात दिवसात कमावले तब्बल इतके कोटी

दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडाही पूर्ण झालेला नाही. पण लवकरच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने सातव्या दिवशी १८.०५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन ९७.३० कोटी झाले आहे. हा चित्रपट सुरुवातीला ६५० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहून हा चित्रपट सध्या ४ हजारांहून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे. तसेच चित्रपटाच्या कमाईतही दिवसेंदिवस वाढ होत आहे.