‘बॉबी जासूस’ या दिया मिर्झाच्या चित्रपटातील गुप्तहेराच्या व्यक्तीरेखेसाठी विद्या बालन सध्या चर्चेत असताना, बॉलिवूडमध्ये पदार्पणातच यश संपादन केलेला अभिनेता सुशांत सिंगदेखील ‘डिटेक्टिव्ह योमकेश बक्षी’ चित्रपटाद्वारे असाच जासूसी अंदाज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘काय पो छे’चा हा अभिनेता अलिकडेच कोलकात्याच्या रस्तांवर या चित्रपटाचे शुटिंग करताना आढळला. पांढरे धोतर नेसलेला आणि शर्टावर हिरव्या रंगाचा मळकट कोट परिधान केलेला सुशांत चित्रीकरणाच्या ठिकाणी आढळून आला. व्यक्तीरेखेची गरज म्हणून सुशांतने मिशादेखील ठेवल्या आहेत. सुशांतचे दिसणे चित्रपटाच्या कथेतील व्यक्तिरेखेला साजेसे असल्याने दिग्दर्शक दिवाकर बॅनर्जी अतिशय खूश आहेत. चित्रपटाचे बहुतांश शुटिंग हे कोलकत्यामध्येच होणार आहे. योमकेशच्या सर्व ३३ कथांचे अधिकार दिवाकर बॅनर्जींनी विकत घेतले आहेत. आमिर खानच्या पीके या आगामी चित्रपटात दिसणार सुशांत कामाच्या व्यापातून वेळ काढून अनिता लोखंडे या त्याच्या गर्लफ्रेण्डबरोबर सुट्टीवर जाण्याची योजना बनवत असल्याचे समजते.

Story img Loader