दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी २० जून रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. लग्नाच्या ११ वर्षांनंतर राम व उपासना आई-बाबा झाले आहेत. मुलगी झाल्याचे कळताच राम चरण आणि उपासनावर त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान प्रसृतीच्या अगोदर उपसनाचा रुग्णालयातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये डॉक्टर उपासनाला व्हिलचेअरवरुन डिलिव्हरी रूममध्ये घेऊन जाताना दिसत आहेत. यादरम्यान उपासना आनंदी दिसत आहे. तसेच ती भावनिक झाल्याचेही पाहायला मिळत आहे. उपासनाच्या पुढे रामचरण चालत जाताना दिसत आहे. उपासनाची मैत्रीण मेहा पटेलने इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या स्टोरीवर लिहण्यात आलं आहे “५ दिवसांपूर्वी. आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण. खूप प्रेमाने वेढलेला.”
आई झाल्यानंतर चार दिवसांनी उपासनाने इन्स्टाग्रामवर फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रामचरणच्या मांडीवर त्यांच्या घरातील श्वान बसलेला दिसत आहे. तर उपासनाच्या मांडीवर त्यांची मुलगी आहे. दोघांच्या पाठीमागे गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे फुगे आणि फुले लावली आहेत. त्यावर ‘वेलकम होम बेबी’ असे लिहिले होते. फोटोच्या कॅप्शनमध्ये उपासनाने लिहिले की, “आमच्या चिमुरडीचे केलेले स्वागत पाहून भारावून गेलो. तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल सर्वांचे आभार.”
राम आणि उपासना यांनी १४ जून २०११ रोजी लग्न केले. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये रामने उपासना गरोदर असल्याची गोड बातमी दिली होती. आता लग्नाच्या ११ वर्षांनंतर दोघेही एका गोंडस मुलीचे पालक झाले आहेत. राम चरण आणि उपासनाने काही दिवसांपूर्वीच त्यांनी लग्नाचा ११ वा वाढदिवस साजरा केला.