शुक्रवार १ ऑगस्ट – ‘पोस्टर बॉईज’, शुक्रवार ८ ऑगस्ट – ‘रमा माधव’ आणि ‘सॅटरडे संडे’, शुक्रवार १५ ऑगस्ट – ‘लोकमान्य’ आणि ‘रेगे’ हे आहे मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाचे वेळापत्रक. याशिवाय आणखी एखादा चित्रपट या गर्दित शिरण्याचा प्रयत्न करीलही, पण या चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीच्या रस्सीखेचमध्ये ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ अशा आणखी काही मराठी चित्रपटांची भर पडली. म्हटल तर सगळ वातावरण मराठीमय आहे, म्हटल तर या गर्दीचा मराठी चित्रपटाचा एकमेकांना धक्का लागू शकतो.
त्यातच ‘किक’, ‘सिंघम रिटर्नस्’, ‘हैदर’, ‘मेरी कोम’ आणि ‘बँग बँग’ या हिंदी चित्रपटांच्याही पूर्वप्रसिध्दीला जागा आणि वेग मिळणार, त्याचाच जास्त धक्का बसण्याची भीती तर नाही?…

Story img Loader