मध्यमवर्गीय कुटुंबात सुखी समाधानी आयुष्य जगणाऱ्या एका तरुणीच्या आयुष्यात घडणारी एक घटना तिच्या जगण्याचा नूरच पालटवून टाकते, मात्र या परिस्थितीतही आत्मविश्वासाच्या जोरावर जगण्यातला सूर ती ढळू देत नाही, या नव्या आव्हानांना ती कशी सामोरी जाते, तिचे जगणे कसे सावरते याची सकारात्मक गोष्ट म्हणजे ‘सुभाषसिंग रामस्वरूप’ निर्मित रमेश मोरे दिग्दर्शित ‘सूर राहू दे’ हा चित्रपट.
श्री. परमानंद प्रॉडक्शन निर्मिती असलेल्या या चित्रपटात सध्याची लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा शिरीष जोशी प्रमुख भूमिकेत असून ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल– आठल्ये एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहेत. नवतारका भाविता पुंडीर या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत दाखल होत असून मृणाल चेंबुरकर, अंशुमन विचारे, मंगेश सातपुते, क्षितीज झावरे यांच्याही यात भूमिका आहेत. तसेच अविनाश नारकर, उदय सबनीस हे पाहुणे कलाकार म्हणून या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन रमेश मोरे यांचे असून छायांकन अनिकेत खंडागळे यांचे आहे. महेश नाईक यांनी पार्श्वसंगीत दिले आहे, तर समीर दाभोळकर यांनी कलादिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली आहे. वसंत कुबल संकलक असून यशश्री मोरे यांनी कार्यकारी निर्मातीची जबाबदारी पार पाडली आहे.
‘सूर राहू दे’ हा चित्रपट येत्या ६ डिसेंबरला हा चित्रपट मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली इथे प्रदर्शित होत आहे.
जगण्यातला सूर ढळू न देणारा ‘सूर राहू दे’
नव्या आव्हानांना ती कशी सामोरी जाते, तिचे जगणे कसे सावरते याची सकारात्मक गोष्ट म्हणजे रमेश मोरे दिग्दर्शित 'सूर राहू दे' हा चित्रपट.
आणखी वाचा
First published on: 22-11-2013 at 11:07 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upcoming marathi movie sur rahu de