चित्रपट प्रदर्शित झाला की तो पाहायला जास्तीत जास्त प्रेक्षकांची गर्दी कशी खेचता येईल, यासाठी निर्मात्यांचे हरएक तऱ्हेने प्रयत्न सुरू असतात. पण प्रेक्षक तरी आठवडय़ाला किती चित्रपट पाहू शकतील? हा शुक्रवार म्हणजे प्रेक्षक थोडे आणि चित्रपटांची संख्या भरमसाट अशी आहे. छोटे-मोठे असे तब्बल १४ चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित झालेत. चित्रपटांच्या संख्येचा हा आकडा कोडय़ात टाकणाराच आहे. त्यामुळे या चौदांमधले निवडक आणि पाहण्यायोग्य अशा काही चित्रपटांचाच विचार केलेला बरा.. आणि तसा विचार करता यावेळी हिंदीपेक्षा मराठीचे पारडे जड आहे यात शंका नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुरांबा
‘मुरांबा’ हा नावाप्रमाणेच मुरलेल्या नात्यांचा वेध घेणारा गोड चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रोमोज आणि समाजमाध्यमांवरच्या वैविध्यपूर्ण जाहिरातींनी याआधीच चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण केलेली आहे. वरुण नार्वेकर या दिग्दर्शकाने पहिल्याच चित्रपटात वडील आणि मुलामधील नाते उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. सचिन खेडेकर आणि चिन्मयी सुमित या कसलेल्या जोडीबरोबर अमेय वाघ आणि मिथिला पालकर या आजच्या पिढीचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करणारी जोडी या चौघांनीही चित्रपटाचा गोडवा वाढवला आहे. त्यामुळे केवळ मुलगा-मुलगी यांच्या नात्यांचा नाही तर एकूणच आपले नात्यांचे बंध आणि त्यातून पुढे सरकणारे आयुष्य हे वरुणसारख्या तरुण दिग्दर्शकाच्या लेखणीतून आणि कॅमेऱ्यातूनही पाहायची ही संधी लहानथोरांनी सोडू नये अशी आहे.
‘एफयु’
‘फ्रेंडशीप अनलिमिटेड’ हा महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट तरुणाईसाठी पर्वणी ठरेल. महाविद्यालयात शिकताना होणारी मैत्री कधीच विसरता येत नाही. कित्येकदा तेव्हाचे मित्र एकमेकांचे हात धरून आयुष्यभर साथ देतात. या चित्रपटाच्या निमित्ताने महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणांच्या भावभावना, मैत्री-प्रेम या गोष्टी नव्याने अनुभवता येणार आहेत. पुन्हा हा संगीतमय चित्रपट असून त्यातली ‘पिपाणी’, ‘गच्ची’, ‘गर्लफ्रेंड कमिनी चीज है’ अशी गाणी आधीच लोकप्रिय झाली आहेत. ‘सैराट’नंतर आकाश ठोसर पूर्ण नव्या ढंगात दिसणार आहे. त्याच्याबरोबर संस्कृती बालगुडे, वैदेही परशुरामी, मयूरेश पेम, शुभम किरोडीअन, सत्या मांजरेकर या तरुण गँगबरोबर सचिन खेडेकर, ईशा कोप्पीकर, बोमन इराणी, मेधा मांजरेकर, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, आनंद इंगळे अशी मोठय़ा कलाकारांचीही मोठी फौज आहे.
बेवॉच
‘बेवॉच’ दोन गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे. एकतर याच नावाचा अमेरिकन टेलीव्हिजन शो चांगलाच गाजला होता. आणि दुसरे म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा हा पहिलाच हॉलीवूडपट आहे. तिने याआधी ‘क्वाँटिको’मधून हॉलीवूड टेलीव्हिजनवर आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे पहिल्याच हॉलीवूडपटात खलनायकी व्यक्तिरेखा रंगवणाऱ्या प्रियांका चोप्राला पाहणे उत्सुकतेचे ठरेल. सेठ गॉर्डन दिग्दर्शित ‘बेवॉच’मध्ये डाऊने जॉन्सन, झेक अॅफ्रॉन, अॅलेक्झांड्रा दादारिओ यांच्या भूमिका आहेत. फ्लोरिडाच्या बीचवर तैनात असलेल्या लाईफगार्ड्सच्या टीमची ही अॅक्शनपॅक्ड आणि तेवढीच विनोदी अशी तद्दन व्यावसायिक मसाला असलेली कथा चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
वंडर वुमन
‘डीसी’ कॉमिकमधून रुपेरी पडद्यावर उतरलेली ही ‘वंडर वुमन’ आहे. वॉर्नर ब्रदर्सच्या या चित्रपटात गॅल गॅडॉत हिने ‘वंडर वुमन’ची मुख्य भूमिका साकारली आहे. ती सुपरहिरो आहे, त्यामुळे सुपरहिरोच्या करामतींना साजेशी अशीच या चित्रपटाची कथा आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अॅमेझॉनमधील एका बेटावर राहणाऱ्या प्रिन्सेस डायनाचीही गोष्ट आहे. तिच्या गोष्टीला अर्थातच जागतिक युद्धाची पाश्र्वभूमीही देण्यात आली आहे. सध्या तरी ही गॅलची ‘वंडर वुमन’ आणि ‘बेवॉच’ची आपली प्रियांका चोप्रा यांच्यात रुपेरी पडद्यावर कोणाची सरशी होणार, याचीच चर्चा जास्त रंगली आहे.