प्रसिद्ध अभिनेता उपेंद्र लिमये यांच्या प्रमुख उपस्थितीत एस. एस. क्रिएशन्सच्या ‘रोप’ या आगामी चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. पुण्यातील दगडुशेठ गणपती मंदिरात एका भव्य सोहळय़ात हा मुहूर्त करण्यात आला. एक चांगली कलाकृती रसिकांसमोर सादर करण्याच्या उद्देशाने ‘रोप’ची निर्मिती करण्यात आली आहे, अशी भावना चित्रपटाचे निर्माते साईनागराज आणि श्रुजना यांनी व्यक्त केली. चित्रपटाचे दिग्दर्शन सूर्या यांचे असून कपिल जोंधळे कार्यकारी निर्माते आहेत. ‘रोप’ हा एक सशक्त कथानक, श्रवणीय संगीत आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा चित्रपट असेल, असे दिग्दर्शक सूर्या यांनी स्पष्ट केले. लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

चित्रपटाच्या मुहूर्त सोहळय़ाला निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यासह चित्रपटाचा चमू श्रुती शेट्टी, कपिल गुडसूरकर, ऋषभ मोरे, बालकलाकार धृती या कलाकारांसह प्रॉडक्शन डिझायनर नेरंगलवार राज गौड, प्रॉडक्शन मॅनेजर बाबासाहेब पाटील, कथालेखक बी. सुदर्शन, संवादलेखक संजय नवगिरे, संगीत दिग्दर्शक राजवीर गांगजी, कलादिग्दर्शक प्रकाश शिनगारे, धनंजय साबळे, सहदिग्दर्शक आशीष पवार, महेंद्र गाजभरे, वेशभूषाकार अर्चना बुक्कावार, गीतकार मंदार चोळकर, पब्लिसिटी डिझायनर जय कुंभारे आणि चित्रपट क्षेत्रातील इतर नामवंत मंडळी उपस्थित होती.

artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
quantum chip Willow solves in 5 minutes
Quantum Chip :सुपर कॉम्प्युटरलाही हजारो वर्षे लागतील; पण गूगलची ‘ही’ नवी चिप ५ मिनिटांत उत्तर देईल
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
Chandrakant Patil appeal to Pune residents regarding the book festival Pune news
नागपूरचा की पुण्याचा पुस्तक महोत्सव मोठा करायचा हे तुम्ही ठरवा- चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना आवाहन
Story img Loader