‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातून बाहेर पडल्यापासूनच अभिनेत्री उर्फी जावेद चांगलीच चर्चेत आली आहे. उर्फीने तिच्या बोल्ड अंदाजासोबतच तिच्या हटके स्टाइलने अनेकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पुन्हा एकदा उर्फी तिच्या कपड्यांमुळे ट्रोल झाली आहे. मात्र, यावेळी तिला नेटकऱ्यांनी विमानतळावर असल्यामुळे ही ट्रोल केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्फीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर बॉलिवूड पॅपने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी विमानतळावर असल्याचे दिसते. उर्फीने क्रीम रंगाचा ओव्हर कोट आणि ब्रालेट परिधान केले आहे. ब्रालेट मधला उर्फीचा हा लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : Bigg Boss 15: ‘ही’ महिला स्पर्धक अंघोळ करत असताना प्रतीकने तोडला दरवाजा अन्…

आणखी वाचा : घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना समांथाने दिले सडेतोड उत्तर

नेटकऱ्यांनी यावेळी उर्फीला फक्त तिच्या कपड्यांमुळे नाही तर नेहमी विमानतळावर असते असं म्हणतं ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, “अरे ही वेडी बाई.” दुसरा नेटकरी म्हणाला, “हिला कोण ओळखत नाही, लोकप्रियतेसाठी फक्त विमानतळावर जाते.” तिसरा नेटकरी म्हणाला, “या मुलीला लाज वाटली पाहिजे ती मुस्लीम आहे.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “स्पष्टपणे दिसत आहे. कोट बाजुला घेत ती ब्रालेट दाखवते. बेड रूममध्ये घालणारे कपडे विमानतळावर घालते आणि ते पण फोटो काढण्यासाठी दाखवते. कुंद्राला भेट,” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी उर्फीला ट्रोल केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed again troll after spotted at airport in transparent revealing bralette and open jacket dcp