उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाणारी उर्फी रोज वेगवेगळ्या लुकमध्ये दिसते. याशिवाय ती इंस्टाग्रामवर चाहत्यांसह तिच्या मनमोहक स्टाइलचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. कधीकधी यामुळे तिला टीकेलाही सामोरे जावे लागते. मात्र सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळे उर्फीला फारसा फरक पडत नाही. ती टीकाकारांना सडेतोड उत्तर देतानाही दिसते. आताही उर्फीने असंच काहीसं केलं आहे. जेव्हा लाइव्ह सेशनमध्ये एका युजरने सेक्ससंबंधी प्रश्न विचारल्यानंतर त्याला उर्फीने चांगलंच सुनावलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उर्फी जावेदने इन्स्टाग्रामवर नुकतंच एक ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन घेतलं होतं. प्रवासात असताना घेतलेल्या या सेशनमध्ये तिने चाहत्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली. पण या सेशनमध्ये एका युजरनं तिला आक्षेपार्ह प्रश्न विचारला. ज्यावर भडकलेल्या उर्फीने त्याला चांगलंच सुनावलं. याशिवाय या सेशनमध्ये तिने तिची ग्लोइंग स्किन, फॅशन यांसारख्या गोष्टींवरही भाष्य केलं.
आणखी वाचा-सारा तेंडुलकर नाही तर सारा अली खानला डेट करतोय शुबमन गिल? फोटो होतोय व्हायरल

उर्फी जावेदला एका युजरने या सेशनमध्ये सेक्ससंबंधी आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. लाइव्ह सेशनमध्ये प्रश्न विचारताना त्या युजरने लिहिलं, “माझ्याशी XXX करशील का?” यावर उर्फीने उत्तर दिलं, “म्हणजे YYY, ज्यांच्यासोबत काहीच घडत नाही. ते लोक अशाप्रकारे आपला राग, त्रास आणि तणाव या ठिकाणी येऊन काढत आहेत. मी काय करू?” याशिवाय एका युजरनेही, ‘तू माझ्याशी सेक्स करशील का?’ असा प्रश्न विचारला. यावर उर्फी चिडून म्हणाली, “अरे तुम्ही लोक सेक्स म्हणजे लोणचं समजला आहात का?(सेक्स को आम का अचार समझ बैठे हो क्या?)”

आणखी वाचा- “एक दिवस मी कपडेच घालणार नाही…” उर्फी जावेदचं बोल्ड वक्तव्य

दरम्यान उर्फी नेहमीच तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अर्थात तिच्या अतरंगी आणि शॉर्ट ड्रेसमुळे अनेकदा तिला सोशल मीडियावर ट्रोलही व्हावं लागतं मात्र उर्फी अशाप्रकारच्या टीकेकडे दुर्लक्ष करताना दिसते. “लोक मला ट्रोल करत असले तरीही ते माझ्या बद्दल बोलतात. नकारात्मक का असेना मला त्यातून प्रसिद्धी मिळते आणि हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.” असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.